कर्तव्यावर असतांना वाहक अंबादास लाढानेंचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन…

दिनांक ३१ जुलै श्रीगोंदा:
श्रीगोंदा बस आगारातील जेष्ठ कर्मचारी अंबादास बापूराव लाढाने यांचे आज दिनांक ३१ जुलै रोजी हृद्य विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.आगारात वाहक पदावर कार्यरत असलेल्या लाढाने(आबा)यांना काल दिनांक ३० जुलै रोजी आपली नियोजित कामगिरी पूर्ण करीत श्रीगोंदा बस स्थानकात आल्यावर उलट्याचा त्रास सुरु झाला.उलट्या आणि छातीत दुखू लागल्याने सहकाऱ्यांनी लाढणे यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.मात्र उपाचारास प्रतिसाद मिळत नसल्याने व छातीतील वेदना वाढल्याने त्यांना दुसऱ्या दवाखान्यात हलविण्यात आले.तेथेही लाढणे यांचे शरीर उपाचारस साथ देत नसल्याचे समजले.शेवटी,आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
सकाळी त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.आबा लाढाने यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व तीन विवाहित मुली आहेत.आबांना यावेळी,श्रीगोंदा आगारातील सर्व कर्मचारी , चालक,वाहक,मेकानिक यांनी सामुहिक आदरांजली वाहत दुखः व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading