अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे बहुजन समाजाच्या अस्मितेचा हुंकार..
दिनांक १ ऑगस्ट, श्रीगोंदा:
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलामध्ये महादजी शिंदे विद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
लोक साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे ,बहुजन समाजातील विविध जाती समूहाच्या दुःखांचा वेदनांचा हूंकार आहे, असे प्रतिपादन विद्यालयाचे उपप्राचार्य बी.एस.जाधव सर यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले, बहुजन समाजाच्या मूक समस्यांना अण्णाभाऊ साठे यांनी शब्दबद्ध केले.त्या माध्यमातून प्रस्थापित व्यवस्थेच्या कानावर हक्क आणि अधिकार याचा आवाज पोचविण्याचे कार्य अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने केले.आम्ही त्यांचं साहित्य आत्मसात केले पाहिजे आणि त्यातून नवीन भारत घडवण्यासाठी संदेश घेतला पाहिजे.
अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जात आपले विचार सातासमुद्रापार रशिया पर्यंत पोहचवण्याचे कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले,असे विचार सचिन झगडे सर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे(प्राचार्य)कन्हेरकर सर, (पर्यवेक्षक)बुधवंत सर,(जेष्ठ शिक्षक)विलास दरेकर सर, नवनाथ बोडखे सर,विलास लबडे सर,रामदास कदम सर,हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सुजल भोपे,निनाद लोखंडे आभार प्रदर्शन शिवराज दरेकर यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता नववी इ मधील विद्यार्थ्यांनी व सांस्कृतिक विभागाचे प्रमुख कलाशिक्षक संतोष शिंदे सर यांनी केले..