श्रीगोंदे येथे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न.
दि ०५ ऑगस्ट,श्रीगोंदा:
शहरातील सोनिया गांधी पाॅलिटेक्निक व जीवन संजीवनी मानव संशोधन विकास संस्था सांगली,यांच्या संयुक्त विद्यामाने श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे तीन दिवसीय ‘व्यक्तिमत्व विकास’ कार्यशाळा संपन्न झाली.स्वत:ला ओळखा,हेच खरे शिक्षण आहे.आपली आंतरिक ओळख फार महत्त्वाची असते.असे प्रतिपादन व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक प्रा.राजेश चव्हाण यांनी यावेळी केले.व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक प्रा.राजेश चव्हाण व प्रा.एजाज शेख यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रयोगातुन मार्गदर्शन केले.
चव्हाण पुढे म्हणाले कि,आरशात पाहणे बाह्य ओळख, तर आत्म्यात,अंत:करणात पाहणे आपली आंतरिक ओळख. आंतरिक ओळख फार महत्त्वाची.म्हणून,तर थोर तत्त्वज्ञ सॉक्रेटिसने अखिल विश्वाला ‘स्वत:ला ओळखा’असा सल्ला दिला.असे स्वत:ला ओळखणे अशक्य नसले.तरी,अवघड असते.कारण इथे स्वत:कडे निष्पक्षपातीपणे व वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहावे लागते.आपणच आपली तपासणी करावी लागते.हेच आपले आत्मज्ञान,आत्मओळख.या आत्मज्ञानामुळेच आपल्या कार्यकर्तृत्व,वक्तृत्व,नेतृत्वाला आयाम प्राप्त होतात.प्रबळ,उत्कट,तीव्र आत्मओळख असलेली माणसे विविध मार्गांनी व्यक्त होत जगाला आपली ओळख करून देतात.
यावेळी,(नगरअध्यक्षा)शुभांगी पोटे,(काँग्रेस तालुकाध्यक्ष) प्रशांत दरेकर,प्राचार्य डाॅ.एकनाथ खांदवे,(ग्रामीण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष)मच्छिंद्र सुद्रिक,प्रा.सुनिल माने सर,प्रा.उंडे सर,निरीक्षक गोलांडे एस.पी,प्राचार्य अमोल नागवडे,प्रा.सतिश चोरमले,प्रा.दिनेश शिंदे,प्रा.विक्रम शिंदे,विद्यार्थी प्रतिनिधी प्रमोद म्हस्के,विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते,सुत्रसंचालन प्रा.कानिफनाथ उगले यांनी केले.