श्रीगोंद्यात विद्यालयांभोवती टवाळखोरांचा वाढता उच्छाद,पोलिसांकडे बंदोबस्तासाठी संख्याबळ नाही ?
दिनांक ५ ऑगस्ट,श्रीगोंदा:
तालुक्याच्या ठिकाणी श्रीगोंदा शहरात आपले पुढील शिक्षण घेण्यासाठी,तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून नव्याने महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या,विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उद्देश असतो.मात्र,काही तरुण वेगवेगळ्या दृष्टीकोनातून प्रवेश घेतात,हे काही वेगळे सांगण्याजोगा विषय नाही.श्रीगोंद्यात नावारूपाला आलेले दोन तीन मोठे महाविद्यालये आहेत.तशेच,पाच सहा विद्यालये आहेत,या विद्यालयांसह महाविद्यालयात हजोरोच्या संख्येने विद्यार्थी अध्ययन करीत आहेत.
सकाळी कॉलेज व शाळा भरतांना व संध्याकाळी सुटतांना,विद्यार्थ्यांचा जाण्या येण्याच्या मार्गासह,बस स्थानकांवर मोठ्या प्रमणात टवाळखोरांचा उच्छाद वाढताना दिसत आहे.अनेक पालकांनी या संदर्भात शाळा महाविद्यालयांकडे तक्रारी केल्या आहेत.तसेच,शाळा व विद्यालयांनी पोलिसांकडे संबंधित प्रकरणी अनेक वेळा तक्रारी आणि सूचना केल्याचे माध्यमांना सांगितले आहे.मात्र स्थानिक पोलीस प्रशासनाकडे संख्याबळ नसल्याचे समजते आहे.यापूर्वी अनेक प्रकरणातून या टवाळखोरांचा विषय ऐरणीवर आला.मात्र,या प्रकरणी पोलीसांची कारवाईची थंडावल्याचे नवीन नाही.
अक्षरशः शाळा महविद्यालयातील तरुणींना असल्या गुंड प्रवृतींच्या तावडीतून कसाबसा आपला जीव मुठीत धरून रोजचा प्रवास करवा लागत असल्याचे सर्वांनाच दिसत आहे.शाळा व महाविद्यालये यांनी याबाबी ध्यानात घेत सी.सी.टीव्ही.बसवले आहेत.मात्र,यांचा उच्छाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही.वारंवार अनाठाई इसम किंवा व्यक्ती एकाच ठिकाणावरून नमूद वेळी वेगाने गाड्या येजा करतांना आढळतात .याची माहिती पोलिसांना मिळूनही,पोलीस मात्र,याविषयी पार थंडावलेल्या अवस्थेत असल्याचा पालकांचा आरोप आहे.पोलीस यंत्रणा अवैद्य धंद्यांच्या बंदोबस्तात इतकी व्यस्त आहे.कि,पालकांनी पोलिसांवर विसंबून राहण्यापेक्षा,आपल्या पाल्याची काळजी स्वतःच घेण्याची वेळ श्रीगोंद्यात निर्माण झाली आहे.