श्रीगोंदा तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा…
दिनांक ६ ऑगस्ट,श्रीगोंदा :
गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात होणाऱ्या अतीवृष्टीमुळे,धरणातून होणारा पाण्याच्या विसर्ग जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा नदीत होत असल्याने,नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून,स्थानिक प्रशासनाने श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.श्रीगोंद्याचे (तहसीलदार)महेंद्र माळी यांनी याविषयी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली आहे.दिलेल्या निवेदनात प्रशासनाने नमूद केले आहे.श्रीगोंदा तालुक्यात आजपर्यंत सरासरी २७२.६ मी.मी.म्हणजे ३८.२५ टक्के पाऊस झालेला आहे.पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार,पाण्याचा विसर्ग नद्यांत सोडण्यात येत असल्याबाबत,जलसंपदा विभागाने कळविले असल्याने,धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिरिक्त पाऊस झाल्यास,धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होऊन,पर्यायाने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता प्रशासनामार्फत नमूद करण्यात आली आहे.
आगमी काळात पुणे जिल्ह्यात पावसामुळे,धरणात सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ झाल्यास तालुक्यातून वाहणाऱ्या घोड व भीमा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची श्यक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.तालुका प्रशासनामार्फत तमाम नागिकांना आवाहन करण्यात आले आहे की,स्थानिक प्रशासनाच्या सूचनाचे पालन करावे,अत्यावश्यक असल्याशिवाय,नागरिकांनी घरच्या बाहेर पडू नये, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्तलांतर करावे, ओढे व नाल्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी दक्ष रहावे, पाणी पातळीत वाढ होत असल्यास.नदीपात्रापासून, ओढे नाल्यांपासून दूर रहावे,नदी,ओढे,नाल्यांची पाणी पातळी वाढून पुलांवरून पाणी वाहत असल्यास,पूल ओलंडू नये, पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये,जुनाट व मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती व वास्तूंमध्ये आश्रय घेऊ नये, अतिवृष्टीमुळे भूस्खलन व दरड कोसळण्याची शक्यता असते, त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घेण्याची सूचना (तहसीलदार)महेंद्र माळी यांनी तालुक्यातील नागरिकांना केली आहे.
याचबरोबर,घाट रस्त्याने प्रवास करण्याचे टाळावे, धरण व नदी क्षेत्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी,नदीच्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये, अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास,धोका उदभवू शकतो, धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरू नका, अश्या ठिकाणी सेल्फी काढू नका, या आणि विविध प्रकारच्या सूचना स्थनिक प्रशासनामार्फत नागरिकांना देण्यात आल्या आहेत. अश्या आपत्कालीन परस्थितीत तहसील कार्यालय श्रीगोंद, दूरध्वनी क्रमांक ०२४८७/२२२३२२ तशेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या दुरध्वनी ०२४८७/२२२३३३ या क्रमांकावर संपर्क करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याबरोबरच जिल्हा नियंत्रण कक्ष (जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर) येथील दुरध्वनी क्रमांक १०७७ (टोलफ्री) किंवा ०२४१/२३२३८४४ व २३५६९४० या क्रमांकावर संपर्क करीत प्रशासनास मदत करण्याचे आवाहन या प्रसिद्धीपत्राद्वारे करण्यात आले आहे.