मुख्याध्यापिका नगिना शेख यांच्या आगमनापासून जि.प.शाळेचा कायापालट.
इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेकडे वाढता ओघ…

दिनांक ४ जुलै,श्रीगोंदा :
तालुक्यात अनेक खाजगी शाळा आणि महाविद्यालये झाली असून,ते आप आपल्या परीने विद्यार्थी आकर्षित करण्याच्या प्रयत्न करताहेत.अश्या ह्या स्पर्धेच्या कालखंडात जिल्हा परिषद किंवा शासकीय शाळा,कोठेतरी प्रक्रियेत मागे पडत असतांना,नगिना शेख या मुख्याध्यापिकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत,जिल्हा परिषद शाळा श्रीगोंदा मुले या शाळेचे रंगरुपच बदलून टाकल्याचे निदर्शनास येत आहे.साधारण एक वर्ष्यांपूर्वी मुख्याध्यापिका पदाची सूत्रे हातात घेत,विविध सामजिक,सांस्कृतिक,वैचारिक,शैक्षणिक, बांधिलकीचे उपक्रम याठिकाणी राबविण्यात त्या अग्रणी राहिल्या आहेत.
शाळेच्या प्रांगणात विविध फुलांची झाडे,प्रशस्थ प्रांगण,मुलांना शालेय पोषण आहार,आहारात अंडी,केळी,दुध याबरोबरच प्रोस्ताहन पर कार्यक्रम राबविणे,चित्रकला स्पर्धा,वृक्षरोपण करीत विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संगोपनाची आवड निर्माण करणे.अश्या विविध योजनांतून मुलांच्या बाल मनावर चांगले संस्कार करण्याचा मानस मुख्याध्यापिका शेख यांनी बाळगल्याचे पालकांकडून समजते आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले या शाळेच्या माध्यमांतून व विशेषतः शेख बाई यांच्या पुढाकारातून शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी निरनिराळे उपक्रम राबविण्यात आले आहेत.शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करीत,मुलांना वृक्ष संगोपनासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे,शालेय वेळेपूर्वी अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे,चित्रकला मार्गदर्शन,शुद्ध हस्ताक्षर मार्गदर्शन,आणि मुख्याध्यापिका शेख यांच्या मार्गदर्शनाखाली इय्यत्ता पाचवीत १०० टक्के गुरुकुल पात्र विद्यार्थी याच शाळेतून गेले असल्याचे समजते आहे,जनरल नॉलेज मार्गदर्शन,आदर्श व सप्तरंगी परिपाठ,पाचवीच्या स्कॉलरशिपची इय्यत्ता चौथीत मध्येच तयारी करून घेण्यात येत आहे,गोवर व रुबेला लसीकरण प्रभावीपणे राबिविण्यात आले आहे,चेस,कॅरम या बौद्धिक खेळांबरोबर कब्बडी,खो – खो या मैदानी खेळांना महत्व देत,विद्यार्थ्यांना खेळांत आवड निर्माण केली जात आहे,सांस्कृतिक कार्यक्रमांत सदरील शाळेस केंद्र पातळीवर प्रथम क्रमांक तर चित्रकला स्पर्धेत जिल्हा पातळीवर तिसरा क्रमांक मिळालेला आहे,सकाळ चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादित केले आहे,शाळेत कॉम्पुटर सह (broadband) इंटरनेट बसविण्यात आले आहे,शिवाय संपूर्ण शाळा सी.सी.टी.व्ही.च्या निगराणीत आहे,यावर्षी दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शाळेत नवीन प्रवेश मिळाला असून,यामुळे शाळेचा पट ३८३ वर गेला आहे,इंग्लिश मिडीयम मधून बरेच विद्यार्थी मराठी माध्यमांत दाखल झालेले आहेत.अश्या विविध उपक्रमांना हाती घेत,मुख्याध्यापिका नगिना शेख यांनी या जिल्हा परिषद शाळेचे स्वरूपच बदलून टाकत कायापालट केला असल्याची बऱ्याच पालकांत चर्चा आहे.यापूर्वीची शाळेची स्थिती आणि आजची वास्तवात स्थिती यात अमुलाग्र बदल झाल्याचे सहज दिसून येत आहे.
आज या शाळेत दीडशेहून अधिक मोठी सावली देणारी झाडे, तर शेकडो फुलझाडे व शोभेची झाडे पोसली आहेत,येन दुष्काळात पाण्याची व्यवस्था करीत स्वतः मुख्याध्यापिकांनी लक्ष घालीत,हे झाडे जगवली आहेत. याठिकाणी शाळेत आल्यावर पाल्यांसह पालकांचेही मन प्रसन्न होत आहे. मुख्याध्यापिका शेख यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले,या शाळेचे पूर्ण रंगरूप बदल्याने शासकीय शाळांकडे सामान्य पालकांसह सक्षम कुटुंबातील पालकांचा दृष्टीकोन बदलला असून,ते या शाळेकडे आकर्षित होतांना दिसत आहेत.शेख यांनी राबवलेल्या या उपक्रमांना काही विघ्न संतोषी लोकांचा विरोध झाल्याचे ऐकण्यात येत असले.तरी,अनेकांनी मुख्याध्यापिका शेख यांचे मनापासून स्वागत केले आहे.यापुढेही विविध उपक्रम राबवीत शाळेचे नाव जिल्हा स्थरावर झळकावे यासाठी मुख्याध्यापिकांना पालकांसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


