“प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा”दुर्लक्षित शेतकऱ्यांना लाभ मिळावा.अन्यथा,पिसोरे खांड येथील शेतकरी रास्ता रोको करणार..
दिनांक १ ऑगस्ट, पिसोरे खांड,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड या गावातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी चा लाभ मिळालेला नसून,तो दिनांक ६ ऑगस्टपूर्वी लाभार्थ्यांना देण्यात यावा.या प्रमुख मागणीसाठी पिसोरे खांड येथील शेतकऱ्यांनी प्रशासनास आंदोलनाचा इशारा दिला आहे.या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांना या विषयीचे निवेदन सादर केले आहे.
सदरील निवेदनात पिसोरे खांड येथील पाच एकर व त्यापेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना,”प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा”लाभ मिळालेला नसून,बहुतांश शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत.प्रशासनाने आवश्यक ते कागदपत्रे घेत संबंधित लाभार्थ्यांना या योजनेत सामाविस्ठ करावे. अन्यथा,दिनांक ६ ऑगस्ट रोजी सर्व वंचित शेतकऱ्यांच्या वतीने पिसोरे खांड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.असा इशारा या सदर निवेदनातून केला आहे.
या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते सुनिल ओहोळ,महेंद्र इंगळे,गणेश येरकळ,आप्पासाहेब इंगळे,पठाण इंगळे,सुनिल गोरे,विठ्ठल कुदांडे,पोपट शिंदे,अंकुश गोरे,पप्पू दळवी,गणपत सूर्यवंशी,शरद गावडे,बाळासो ओहोळ,शिवाजी गुंजाळ,सचिन शेख,बाळू येरकळ,बबन गावडे,सह पंचक्रोशीतील वंचित लाभार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.