भानगाव येथील आदिवासी हत्याकांडाचा,बहुजन समाज पार्टीकडून तीव्र निषेध…पोलीस प्रशासनास विविध मागण्यांचे निवेदन सादर…

दिनांक ७ सप्टेंबर भानगाव (श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव मध्ये दिनांक ५ सप्टेंबर रोजी,घडलेल्या आदिवासी अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद तालुक्यात सह जिल्ह्यात उमटतांना दिसत आहेत. अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसें दिवस वाढ होत असून,या घटना थांबवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.वाढत्या अत्याचारांचे प्रकरणे लक्षात घेत,श्रीगोंदा तालुका दलित-आदिवासी अत्याचारग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्याची मागणी यावेळी,बहुजन समाज पार्टी सह आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या पुरोगामी संघटनांनी,स्थानिक पोलीस प्रशासनास निवेदन देत केली आहे.
नमूद निवेदनात दिनांक पाच सप्टेंबर रोजी भानगाव येथील आदिवासी पारधी समाजातील कुटुंबाला,अमानुषपणे मारहाण झाली.या मारहाणीत दोन वर्ष्याच्या छोट्या मुलाचा जीव गेला आहे.सदर घटना अतिशय निंदनीय असून,बहुजन समाज पार्टीच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे.अशा नराधमांना कठोर शासन व्हावे.म्हणून,प्रशासनाने योग्य दिशेने तपास करावा.कायदा हातात घेणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.या मागण्यांसाठी,श्रीगोंद्याचे (पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव यांना आज दिनांक ७ सप्टेंबर रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे.
याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये अन्याय अत्याचारांच्या घटनांत दिवसें दिवस वाढत चालल्या असून,या उपेक्षित समाजांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेषतः श्रीगोंदा तालुक्यात आदिवासींवरील अत्याचारांच्या घटनांनी कळस केलेला आहे.अनेक पीडितांनी अश्या घटनांना कंटाळून,जिल्हा सोडल्याचे निवेदनात नमूद केले आहे.काही घटनांमध्ये स्थानिक प्रस्थापित पुढारी गुन्हेगारांच्या बचावासाठी पोलिस प्रशासनावर दबाव आणत असल्याचे नवीन नाही.अशा पद्धतीने सत्ताधारी,जातीवादी पुढाऱ्यांचा ही या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला.
अॅट्रॉसिटीच्या घटनांमध्ये सर्रासपणे अटकपूर्व मिळत असून,त्यामुळेही गुन्हेगारांचे मनोबल वाढत चालले आहे.सरकार जातीवादी व मनुवादी धोरणांचे असल्याने,जातीवादी गावगुंड,स्थानिक क्षेत्रात दलित आदिवासी यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय-अत्याचार करत आहेत.विद्यमान फडणवीस(पेशवाई) सरकारचाही बहुजन समाज पार्टीच्या आंदोलकांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.भानगाव येथील आदिवासी कुटुंबाला तात्काळ संरक्षण देत,त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे,तसेच इतर आरोपींना लवकरात लवकर अटक करावी,श्रीगोंदा तालुक्यातील दलित- आदिवासींवरील वाढत्या अत्याचारांचे प्रमाण लक्षात घेत,श्रीगोंदा तालुका, जिल्ह्यातील दलित – आदिवासी अत्याचार ग्रस्त तालुका म्हणून,घोषित करण्यात यावा.यासाठी फुले-शाहू-आंबेडकरी,पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या समवेत,बहुजन समाज पार्टी,श्रीगोंदा तालुक्यात व्यापक आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बहुजन समाज पार्टीचे (जिल्हा प्रभारी)सुनील ओहोळ यांनी याप्रकरणी गंभीरतेने लक्ष देत,मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.वाढत्या दलित – आदिवाशी अत्याचारांच्या घटना गंभीर असून,यावर शासनाने कठोर निर्बंध घालने काळाची गरज झाली असल्याचे,सुनील ओहोळ यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.पीडितांना संरक्षण,त्यांचे पुनर्वसन आणि तालुका मागासवर्गीय अत्याचारग्रस्त तालुका घोषित करण्यात यावा. यासाठी ओहोळ यांनी आंदोलनाचा इशारा दिंला आहे. निवेदन सादर करतांना बहुजन समाज पार्टीचे(जिल्हा प्रभारी)सुनील ओहोळ, स्वप्नील पवार,मोहनकाळे,सुप्रिया काळे,बलभीम पवार,भालचंद्र सावंत,निलेश गायकवाड,प्रमोद काळे,नितीन रोही,बाबासाहेब रामफळे,मिथुन चव्हाण,अशोक मोरे गोविंद काळे,एकनाथ काळे,संजय काळे,जालिंदर घोडके,अंबादास घोडके,मोहन काळे,सगळ्या काळे,लकास काळे,पार्था जौजांळ सह आंदोलन कर्ते निवेदन देतांना उपस्थित होते.सदर निवेदन श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे (पोलीस निरीक्षक ) दौलतराव जाधव यांना देण्यात आले.यावेळी,पोलीस प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून,संघटनांनी सहकार्य करावे.अशी भूमिका जाधव यांनी यावेळी नमूद केली आहे.

पोलीस निरीक्षक जाधव यांच्याशी भानगाव हत्याकांड प्रकरनी चर्चा करतांना आंदोलक..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading