भानगाव अत्याचार प्रकरनी विशेष सरकारी वकील नियुक्त करावे:
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी..
दिनांक ८ सप्टेंबर,भानगाव(श्रीगोंदा):-
दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी भानगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे आदिवासी पारधी समाजाच्या दोन वर्षाच्या निरागस बालकाची हत्या व एका महिलेसह मुलाचे वडील गंभीर जखमी आहेत.सदरील घटनेत भा.दं.वि कलम ३०२,३०७ अनु जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी विषेश सरकारी वकील अॅड उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका कार्याध्यक्ष प्रमोद काळे यांनी केली आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील सदरील गुन्ह्यातील सर्व आरोपींना पोलिसांनी गजाआड केले असले तरी सदरील घटना ही अत्यंत क्रुरतेचे प्रतिक असून माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असून आदिवासी पारधी समाजासह संपूर्ण बहुजन समाजातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तसेच येणाऱ्या काळात जर या आरोपींना फाशीची शिक्षा नाही झाली तर अशा प्रवृत्तीचे मनोबल वाढेल त्यामुळे आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी व पिडीत कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती होणे गरजेचे असल्याने सदरील प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी विषेश सरकारी वकील अॅड उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका कार्याध्यक्ष प्रमोद काळे यांनी केली आहे.