मागण्यांची दखल न घेतल्यास ११ सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाणार..
शिक्षक समन्वय समिती..
दिनांक ९ सप्टेंबर,श्रीगोंदा:
महाराष्ट्र राज्य शासकीय,निमशासकीय कर्मचारी शिक्षक – शिक्षकेतर समन्वय समितीने, जुनी पेन्शन योजना लागू करावी. यासह इतर संविधानिक मागण्यांसाठी संप करायचे ठरवले होते.त्यानुसार राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी दिनांक ५ सप्टेंबर पासून ८ सप्टेंबर पर्यंत काळी फीती लावून काम केले. आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा संप केला आहे. यासठी,राज्यातील दहा लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत. आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी श्रीगोंद्याच्या तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देत,शिक्षकांनी आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोण्याची प्रशासनास मागणी केली आहे.
१९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व संवर्गात सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी,दूर कराव्यात,कंत्राटी धोरण बंद करून.रिक्त पदे भरण्यात येत केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत,अनुकंप भरती तात्काळ व विनाअट करावी,केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती,बांलसंगोपन रजा व अन्य सवलती लागू कराव्यात,राज्यातील सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदोन्नती,शैक्षणिक पात्रतेनुसार करण्यात यावी, शिक्षण व आरोग्य यांच्यावर जी.डी.पी.च्या सहा टक्के खर्च करण्यात यावा, आरोग्य सेवेचे खासगीकरण बंद करावे , सर्व कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा साठवण्याची कमाल मर्यादा काढण्यात यावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये,आरोग्य विभागातील कामाचे तास निश्चित होईपर्यंत,बायोमेट्रिक प्रणाली आणू नये, लिपिक व लेखा लिपीकाच्या ग्रेट वेतनात सुधारणा करून समान पदनाम,समान काम समान,वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करावेत.
या आणी विविध मागण्यांसाठी श्रीगोंदा तालुक्यातील शिक्षकांसह सर्व शिक्षक संघटनांनी श्रीगोंद्याचे तहसीलदारांना निवेदन सादर केले.यावेळी रामदास भापकर,संदीप मोटे,संतोष टकले, बबन गाडेकर,गोवर्धन दरेकर,शिवाजी रायकर,रमेश सोनवणे,संजय रामफळे,दीपक शेंडगे,अविनाश अंभोरे,संतोष गायकवाड,नवनाथ कन्हेरकर,गिरमकर भाऊसाहेब,संदीप खाडे,संदीप भगत सह सर्व शिक्षक व पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.