श्रीगोंद्यातील बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यात यावा: कामगार राज्य मंत्र्यांना निवेदन सादर.
दिनांक ९ सप्टेंबर,श्रीगोंदा :
श्रीगोंदा तालुक्यात हजारोच्या संख्येने बांधकाम कामगार व लेबर कार्यरत आहेत.मात्र,तालुक्यातून पाच हजार च्या आसपास कामगारांची कामगार कल्याण कार्यालयाकडे नोंद करण्यात आली आहे.उर्वरित बांधकाम कामगार शासनाच्या व प्रशासनाच्या विविध योजनांपासून दुर्लक्षित राहिलेले आहेत.साधारण ८० टक्के कामगार हे अशिक्षित आहेत.यांना गेल्या एक वर्ष्यापासून नोंदणी करण्यास सांगितली आहे.मात्र,संबंधित कार्यालायात नोंदणी झालेल्या कामगारांना,पाच वर्षे नोंदणी लागू असल्याचे सांगितले जात आहे.एक वर्ष पूर्ण होताच,पुन्हा कागदपत्रे मागवीत,पुन्हा नोंदणी करण्यासाठी भाग पाडले जात आहे.या सर्व जाचक अटींमुळे,कामगार अत्यंत बिकट परस्थितिला सामोरे जात आहेत.या सर्व बाबी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी,कामगारांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन रविवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी संतोष(बाळा)भेगडे (कामगार राज्यमंत्री)आणि राम शिंदे (पालकमंत्री अ.नगर) व गुलाब दाभाडे (नाशिक कामगार आयुक्त)जगधने साहेब(कामगार आयुक्त अ-नगर)यांना निवेदन देत,कामगारांच्या भावना शासनापर्यंत पोहचवण्याची विनंती यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकत्यांनी आणि बांधकाम कामगारांनी केली आहे.
कामगारांसाठी जे ओळखपत्र दिले आहे.त्यात योजनांची भरमार आहे,मात्र,प्रत्यक्षात कोणत्याही योजनेची अमलबजावणी होत नाही.श्रीगोंदा तालुक्यात अंदाजे २० हजार कामगार आहेत.त्यांच्यासाठी श्रीगोंद्यात स्वतंत्र कार्यालय असावे.अन्यथा,जिल्हा ठिकाणी स्वतंत्र कर्मचारी टेबल असावा.सुरक्षा कीट आणि साहित्या साठी जी मदत मिळते ती मदत सर्व कामगारांना मिळाली नाही.ज्यांना सुरक्षा किट मिळाले,त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागले आहेत.त्यासाठी कीट श्रीगोंद्यात देण्याची व्यवस्था करावी. राम शिंदे यांनी फक्त कर्जत जामखेड यांच्या मुळे कामगारांना पाच हजार रुपये साहित्या साठी मदत मिळाली आहे.मात्र, श्रीगोंदा तालुक्यातील कामगारांनी सर्व बाबींची पूर्तता करूनही,ते सर्व योजनांपासून उपेक्षित राहिले आहेत.कामगार आजारी पडल्यास अद्याप त्यांच्यासाठी कोणतेही रुग्णालय निश्चित करण्यात आलेले नाही.श्रीगोंदा तालुक्यातील सर्व कामगारांचा सर्व्हे करण्यात यावा.तशेच,काम करत असतांना,कामगारांना सुरक्षा संच पुरवण्यात यावा. एखाद्या कामगाराचा कामा दरम्यान अपघाती मृत्यू झाल्यास.त्यास आर्थिक सहाय्य मिळावे. त्याचबरोबर कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जिम्मेदारी शासनाने घ्यावी.या आणि विविध मागन्यांसाठी बांधकाम राज्य मंत्री बाळू आणि राम शिंदे पालकमंत्री,कामगार आयुक्त मुंबई यांना हे निवेदन सादर करन्यात आले आहे.यावर तात्काळ कारवाई करवी.अन्यथा अन्यत्याग आंदोलन पुढील काही दिवसांत श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर करणार असल्याचे कामगार नेते नितीन रोही यांनी निवेदनात नमुद केले आहे.
या निवेदनावर विनोद परदेशी (जिल्हा अध्यक्ष प्रहार संघटना),प्रकाश बेरड (जिल्हासचिव प्रहार),नितीन रोही(मा.शहर अध्यक्ष प्रहार),सागर जाधव,बंडू कुदळे,बाळू दांडेकर,धनु दांडेकर,नितीन शेंडगे,आनंदा दांडेकर,संदीप पोकळे,अनिल लबडे,शरद औटी,भरत औटी,शिवाजी शेलार,राजेंद्र शेलार,संतोष मडके, छबू शेलार,अरुण पवार, शिवाजी भारती,अशोक देशमुख,अनिल साळवे,संजय शेलार,मंगेश पवार सह श्रीगोंदा तालुक्यातील शेकडो बांधकाम कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.