राजेश सुभाष डांगे यांना रेल्वेच्या”सल्लागार समिती सदस्य”पदि नियुक्त करावे.:अँँड.राम बाळासाहेब काळे .
दिनांक २१ सप्टेंबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते व नगरसभा आंदोलनाचे सर्वेसर्वा, राजेश डांगे यांची शहराच्या विकासासाठी असणारी धडपड आणि सामांन्याच्या मूलभूत प्रश्नांसाठी वारंवार प्रशासनाशी चालू असलेला अविरत संघर्ष्याने नावारूपाला आलेले,तरुण करकर्ते राजेश डांगे, यांच्या लढाउ वृत्तीमुळे,सर्व सामान्य माणसाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी,डांगे नेहमी अग्रणी असतात.
या अनुषंगाने अँँड.राम काळे यांनी नगरसभा आंदोलनच्या वतीने,खासदार डॉ.सुजय विखे यांना निवेदन देत अँँड. सुभाष डांगे हे विखे पाटील घराण्याचे ४०,४५ वर्ष्यापासून विश्वासू कार्यकर्ते आहेत.चिरंजीव राजेश डांगे यांनी देखील,नगरसभा आंदोलना मार्फत श्रीगोंदा कार्यक्षेत्रात आरोग्य,रस्ते,स्तानिक स्वराज्य संस्थेचा कारभार,रेल्वे स्थानक सुविधा,ज्यात एक्सप्रेस रेल्वे थांबण्यासाठी तत्कालीन खासदार,व रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला असल्याचे नमूद केले आहे.
तसेच,लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील युवकांमध्ये त्यांनी मोठा प्रचार केला आहे.तेंव्हा राजेश डांगे यांना रेल्वेच्या “सल्लागार समिती” वर नियुक्ती साठी संधी देण्याचे प्रयत्न करावेत. असे काळे यांनी डॉ. विखे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.