पंधराव्या वर्षी एम.एस.सी.
(सुषमा वर्मा,उत्तर प्रदेश)
इ.स. २००० मध्ये जन्माला आलेली सुषमा वर्मा लखनऊमध्ये कृष्णानगर इथल्या बर्गावन मोहल्ल्यात राहते.तिच्या घरी टीव्ही नाही.छोट्या बहिणीसोबत खेळने हाच तिचा विरंगुळा.इतका अभ्यास आपली मुलगी करते आहे.म्हणून,तिला ट्युशन लावाव्यात, तिला नवीन वह्या पुस्तकं आणून द्यावेत, अभ्यासासाठी तिला वेगळी खोली द्यावी,असं तिच्या आई-बाबांना वाटत असणार.पण त्यांना ते शक्य नव्हतं,वडील तेजबहादुर आठवी पास झालेले. रोजंदारीवर काम करणारे.आई छायादेवी गृहिणी. कधीही शाळेत न गेलली,लिहिता वाचता न येणारा रोजंदारी वरच्या कामगाराला असे किती पैसे मिळत असणार.मुलांना अशा सोयी-सुविधा देण्यात त्यांना परवडनार नव्हतं.
जेमतेम एका खोलीत त्यांच छोटं घर,आई-बाबा,मोठा भाऊ शैलेंद्र,लहान बहीण आनन्या आणि सुषमा असे पाच जण राहायचे.घराच्या कामात आईला मदत करत,लहान बहिणीकडे बघत सुषमा वरच्या वर्गाचा अभ्यास करत होती.
सगळे तिचा आदर कौतुक करायचे आणि त्याबरोबर बालपण ही जपू द्यायचे.गाणी ऐकण,चित्र काढणं, असे तिचे छंद त्यामुळेच टिकून राहिले.सुषमा तेराव्या वर्षी बी.एस्सी.झाली.त्यातही पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टर मध्ये ती महाविद्यालयात पहिली आली.सुषमाचं शिक्षण चालू होतं.पण,तिच्या मनात खंत होती की,आपल्या आईला वाचता लिहिता येत नाही.तिने ठरवलं आपल्या आईला शिकवायचं.

