पंधराव्या वर्षी M.sc.(सुषमा वर्मा)या लेखातील उर्वरित भाग….

लिम्काबुकमध्ये नाव आलं,जपान मध्ये पहिला नंबर आला.तरी,सुषमा हुरळून गेली नाही.तिने जपानहून परत आल्यानंतर,परत नव्या जोमाने आणि उत्साहाने अभ्यासाला सुरुवात केली.ती वेळापत्रक आखत नाही. पण तिला अभ्यास करणं,नवनवीन काहीतरी शिकणं,इतक आवडतं कि तीचा दिवसभरातला बराचसा वेळ अभ्यासात जातो.भरपूर मेहनत आणि मनापासून आनंदाने केलेला अभ्यास यामुळे दहाव्या वर्षी ती बारावी उत्तीर्ण झाली.
इतका अभ्यास करणाऱ्या मुलीने स्वतः एका ठराविक वेळापत्रकात कधी बांधून घेतलेले नाही. ती घड्याळाच्या काट्यावर जगणं पसंत करत नाही. अधून मधून ती उशिरापर्यंत झोपते.स्वतःसोबत बहिणीचही आवरते.बहिणी सोबत भातुकली खेळण्यात तेही रमून जाते.
एके दिवशी बहीण दुपारी झोपल्यावर सुषमा अभ्यासाला बसली.एम.बी.बीएस.ला प्रवेश मिळण्यासाठी एक पूर्वपरीक्षा(प्री मेडिकल टेस्ट) द्यावी लागते.त्याची तयारी सुषमा करत होती.दुपारी बसलेली सुषमा रात्री तिचे बाबूजी घरी आले.तरी,त्याच जागी बसून अभ्यास करत होती.बाबूजींना बघून सुषमा उठली.त्यांना पाणी आणून दिलं आणि परत अभ्यास करायला लागली.
कितना समय हुआ,बेटा जी पढाई कर रहे हो?क्या पता बाबुजी मैने तो घडी ही नही देखी?
बाबुजींनी कपाळावर हात मारला.अच्छा है,जब तक तुम्हारा जी कर रहा है पढ लेना.हा ठीक है?
थोड्या दिवसांनी पूर्व परीक्षा झाली.सुषमाला पेपर सोपा गेला.आता लगेच कोणतीच परीक्षा नव्हती.तरी, सुषमाच काही न काही वाचन,गणित सोडवणे चालू होतं.तिला विचारलं तरी ती म्हणे,अभी एक्झाम नही तो क्या हुआ.कहते है कुछ सीखा हुआ बेकार नही जाता.
सुषमा पूर्वपरीक्षेच्या निकालाची वाट बघत राहीली. तिला डॉक्टर व्हायचं होतं ना.पण विद्यापीठाने तिचा निकाल जाहीर केला नाही.चौकशी केल्यावर विद्यापीठाने सांगितलं की,सतरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मेडिकल कॉलेजला प्रवेश देऊ शकत नाही.पुढे काय शिकावे काय करावे? समजत नव्हते.
इतक्या कमी वयात कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे अवघड होते.पण,तिचा भैय्याने १४ व्या वर्षी बी.सी.ए.केलं होतं.त्यामुळे विद्यापीठातून परवानगी घेणे,पुस्तके घेणे हे त्याला माहीत होतं.तशी लखनऊच्या भीमराव आंबेडकर विद्यापीठामधून विशेष परवानगी घेऊन,तिने बीएससी ला प्रवेश घेतला. त्यासाठीची पुस्तक वह्या इत्यादीचा खर्च कमी पगार असणारे सुषमाच्या बाबूजींना परवडणारा नव्हता. अजून शैलेंद्र भैय्याचा शिक्षण चालू होत. त्यामुळे आई म्हणाली,देखो जी हम कुछ कर लेंगे,पैसे तो नही है. पर बच्चों को बताने की जरूरत नही.है हमे ना मिला पर बच्चो को पढणे दो.त्यावर बाबूजींचे उत्तर,बताने की क्या जरुरत है.माताजी ! एक बारावी हो रही है. दुसरा ग्रेजुएट हो रहा है.हमसे ज्यादा जानकार है दोनो.
Bsc करताना कॉलेजमधली मुलं-मुली सात-आठ वर्षांची मोठी होती.बोलताना तिला अवघड वाटलं पण एकदा मैत्री झाली की.वय आडवा येत नाही असं ती म्हणते.तिच्या शिक्षकांनी,वर्गातल्या मित्र-मैत्रिणीनीं समजावून घेतलं,आदर कौतुक करायचे आणि त्याच्याबरोबर तीच बालपणही जपू द्यायचे. गाणे ऐकणे,चित्र काढने असे तीचे छंद त्यामुळे टीकून राहिले.ती १३व्या वर्षी Bsc झाली.त्यातही पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टर मध्ये ती महाविद्यालयात पहिली आली.
सुषमाचं शिक्षण चांगलं चालू होतं.पण तिच्या मनात एक खंत होती कि,आपल्या आईला वाचता लिहिता येत नाही.म्हणुन तिनं ठरवलं आपल्या आईला शिकवायचं.मम्मी तुम यहा बैठो. कल जो पढाया है उसका रिविजन पहिले करेंगे,फिरं आगे का सिखेंगे.सुषमा आईच्या मागे लागत होती.अभी कहा सुषमा अभी मुझे सब्जी पकानी है.सब्जी बना देता हु.आप पढ लेना.देखो कितने प्यार से सिखा रही है आपको.भाजी फोडणी टाकली आणि सुषमाची आई पाटीवर अक्षर गिरवायला लागली.
Bsc चा अभ्यास करताना सुषमाच्या असं लक्षात आलं की,आता अधिक खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे.तिला रस होता सूक्ष्मजीवशास्त्र मध्ये. (मायक्रोबायोलॉजी)माणसाला उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत,असे सूक्ष्मजीव असतात. हे जीव माती,पाणी,हवा आणि माणसाच्या व प्राण्यांच्या शरीरात असतात.यातील काही सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी असतात.काही अपायकारक असतात.त्यांचा शोध घेणे याच्या अभ्यासाच शास्त्र म्हणजे सूक्ष्म जीवशास्त्र.
सुषमाने सूक्ष्मजीव शास्त्र विषयात बी.एस्सी. ला प्रवेश घेतला,तेव्हा ती बातम्यांमध्ये झळकली होती.लोक तिला ओळखायला लागले होते.तरीही कॉलेजमध्ये सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे तिने सर्व अभ्यास केला. सगळ्या परीक्षा दिल्या.परीक्षेच्या बरोबरीने दिला तिला जाणारा होमवर्क,प्रात्यक्षिके सगळं तिने आवडीने केलं.पंधराव्या वर्षी सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी) विषयात Msc झाली.
तिच्या पुढच्या शिक्षणासाठी सुलभ नावाच्या सामाजिक संस्थेचे प्रमुख डॉक्टर बिंदेश्वरी पाठक यांनी आठ लाख रुपयांची मदत केली.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २०१६ मध्ये सुषमाच्या विद्यापीठात आलेले असताना,त्यांच्या हस्ते तिला मेड्ल ही देण्यात आले. त्यांनी तिला मोबाइल फोन,लॅपटॉप,कॅमेरा अशा काही वस्तूही बक्षीस म्हणून दिल्या.
लॅपटॉप वर वेळ घालवणे आता तिला खूप आवडते. सुषमा म्हणते,या शिक्षणाच्या प्रवासात तिला हा महत्त्वाचा धडा मिळाला आहे.तुमच्यामध्ये कौशल्य बुद्धी असेल आणि त्याच्या सोबतीने जिद्द व चिकाटी असेल ?तर,मदतीचे आपसूक येतात.
लखनऊच्या आसपासची शेत जमीन कोरडी होत चालली आहे. त्यावर काहीतरी उपाय करायला हवा? असं मला वाटतं.निसर्ग,प्राणी व त्यातील संशोधन या विषयातील तिला रस आहे.प्रदूषण हा तिला विशेषता महत्त्वाचा प्रश्न वाटतो.जो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे.त्या विषयातलं ज्ञान आपल्याजवळ असायला हवं,त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण असायला हवं, असं ती मानते.म्हणून,Msc झाल्यावर तिने कृषी सूक्ष्मजीवशास्त्र(एग्रीकल्चर मायक्रोबायोलॉजी)या विषयात phD साठी प्रवेश घेतला.सध्या तिची phD अंतिम टप्प्यात आहे.
सुषमा म्हणते,शिक्षण आपल्या विचारांना चालना देते. आपलं व्यक्तिमत्त्व घडवते.आपल्यात कोणती कलाकौशल्य दडलेली आहेत,हे शिक्षणामुळे कळते. आजूबाजूला काय घडतंय हे आपल्याला माहीत असायला पाहिजे.प्रत्येकाने स्वतःमध्ये सुधारणा केली. तर अख्ख जग बदलेल.असं सुषमाला वाटतं,प्रत्येकाने सृजनाचा ध्यास घ्यावा आणि काही नवनिर्माण करावं असं तिला वाटतं.
लेखन: मृदगंधा दीक्षित
(संकलीत)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading