“संकटांवर मात करत, आजोबांच्या विचारांचा वारसा जपणारा यशवंत”..

यशवंत पोटे यांच्या वाढदिवसानिमित्त…

संपूर्ण देशात अनेक व्यक्ती आपल्या जीवन प्रवासातून प्रेरणा देत असतात. असेच एक नाव घ्यावं लागेल, यशवंत, ज्याने खडतर परिस्थितीतून स्वतःला उभं केलं आणि समाजसेवेच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली. आजोबांच्या विचारांवर आधारलेली त्यांची वाटचाल समाजासाठी आदर्शवत ठरत आहे.

स्नेहालयातील विद्यार्थी यांना वाढदिवसाच्या निमित्त मनोगत व्यक्त करताना

लहानपणापासूनच यशवंतने अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन व्यतीत केलं. शिक्षणासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी लिंबाच्या काटा चालवणे, बाजारात भाजीपाला विकणे, किराणा दुकानावर काम करणे अशा छोट्या कामांतून आपल्या गरजा भागवल्या. लाईट फिटिंगसारख्या कामांतून तो कुटुंबाला आधार देत होता.

विद्यार्थ्यांना शाळा उपयोगी साहित्य देताना..

यशवंतचे आजोबा शेतकरी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी रस्ता रोको आंदोलन, कर्जमाफी, वीज बिल माफी, ऊसाला योग्य भाव मिळावा यासाठी अनेक आंदोलने केली. त्यांचे कार्य करताना ७० ते ८० गुन्हे दाखल झाले, परंतु त्यांनी कधीच मागे हटण्याचे नाव घेतले नाही. त्यांच्या या संघर्षातून प्रेरित होऊन यशवंतने सामाजिक कार्याची दिशा ठरवली.

यशवंतच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी सामाजिक, राजकिय पदाधिकारी…

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही यशवंतने शिक्षणाची ओढ कायम ठेवली. “कमवा आणि शिका” या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ब्रीद वाक्याचा अंगिकार करून त्याने BA पूर्ण केले. सध्या MSW (समाजकार्य) व LLB (वकिली) शिक्षण पूर्ण करत आहे. यशवंत गेली १२ ते १३ वर्षे झाले सर्वसामान्य गरीब भटक्या विमुक्त व इतर सर्व लोकांना सेतू च्या माध्यमातून मदत करत असतो. हे करता करता त्याने त्याचे आजोबा “समाजसेवक किसनराव पोटे मामा विचार धारा ट्रस्ट” या आजोबांच्या नावाने एक बहू उद्देशीय सेवा संस्था नोंदणी करून त्यामार्फत प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यशवंत परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेच्या नावाने किट तयार करून कमीत कमी ३०० ते ४०० किट समाजीक उद्देशाने वाटप करत असतो..

‘सेतू’च्या माध्यमातून यशवंतने गरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. पेन, वही, खोडरबर आदी वस्तूंचा किट तयार करून तो दरवर्षी सर्व शाळांमध्ये वाटप केलेत. याशिवाय, आपल्या आजी कै. सीताबाई किसनराव पोटे यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी वाचनालय भेट दिले. ५००० रुपयांच्या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या वाचनाच्या आवडीला चालना मिळाली.

उपेक्षित, वंचित समाज बांधवांसोबत वाढदिवस साजरा करताना..

यशवंत केवळ शिक्षणातच नव्हे, तर क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातही सक्रीय आहे. समाजातील गरजू लोकांना मदत करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, यासाठी तो नेहमी तत्पर असतो.

संत शेख महंमद बाबा/ महाराज मंदिरात आशिर्वाद घेताना…

यशवंत सांगतो, “मी माझ्या आजोबांच्या विचारांना पुढे नेत आहे. समाजासाठी जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी समाजोपयोगी कार्य करण्याचा निर्धार केला आहे. लोकांचा मिळणारा आशीर्वादच माझ्या आजी-आजोबांच्या स्वप्नपूर्तीची पावती आहे.”

यशवंतचा प्रवास हा केवळ संघर्षाची कहाणी नसून, समाजसेवेच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन इतरांसाठी दीपस्तंभ ठरण्याचा प्रयत्न आहे. त्याचे कार्य हे समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे, आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण समाजाच्या शुभेच्छा आहेत.

महामानव बाबा आमटे वसतिगृहातील मुलांसोबत..

२३ डिसेंबर २०२४ या वाढदिवसानिमित्त यशवंतला “बहुजन समता पत्र” कडून खूप खुप शुभेच्छा..

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading