“श्रीगोंदा: संविधान विटंबना व कोठडीतील मृत्यूविरोधात तालुक्यातील नागरिकांचे धरणे आंदोलन संपन्न.”

दिनांक २० डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:

परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज श्रीगोंद्यात तहसील कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टी आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन व निषेध सभा पार पडली.

परभणी येथे संविधान प्रेमी आणि आंबेडकरी  समाजाच्या निदर्शनांदरम्यान पोलिसांनी महिला, तरुण व मुलांना अटक करून कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अमानुष मारहाण केली. या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ श्रीगोंदा आणि पंचक्रोशीतील विविध संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला.

निषेध सभेत प्रशासन व पोलीस यांच्यावर तिव्र टीका करण्यात आली.

१. संविधान विटंबनेच्या घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा.

२. पोलीस मारहाणीमुळे मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा.

३. कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दलित समाजाविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत.

४. महिला व तरुणांना मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.. अशा मागण्या जाहीर करण्यात आल्या.

सुनील ओहोळ, अनिल ठवाळ, शिवाजी ननवरे, नंदू भाऊ ससाने, अमर घोडके, संजय रणसिंग, भीमराव घोडके, नितीन जावळे, अंबादास घोडके, सत्यवान शिंदे, उत्तम शिंदे, भगवान गोरखे, मुकुंद सोनटक्के, उमाशंकर यादव, राजू शिंदे, रवीनंद कुमार, शहानवाज शेख, गणेश बाळासाहेब काते, कांतीलाल कोकाटे, आबा रामफळे इत्यादींसह तालुक्यातील बहुसंख्य समाज बांधव यावेळेस उपस्थित होते.

यावेळी अनिल ठवाळ, सुनील ओहोळ, भगवान गोरखे, मुकुंद सोनटक्के, कांतीलाल कोकाटे, चंदन घोडके, शिवाजी ननवरे, नंदकुमार ससाने, अमर घोडके इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले व परभणी, बीड आणि शहा यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. 

आंदोलनाच्या शेवटी निवासी नायब तहसीलदार अमोल बन व पोलीस कॉन्स्टेबल अरुण पवार यांनी आंदोलकांकडून मागण्यांचे निवेदन स्वीकारले आहे. महापुरुषांच्या घोषणा देत आंदोलन शांततेत संपन्न झाले.

स्रोत (प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading