दिल्ली सायबर क्राईम पोलिसांची श्रीगोंद्यामध्ये कारवाई: जायकर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल..

दिनांक २० डिसेंबर २०२४, श्रीगोंदा/दिल्ली:

दिल्ली सायबर क्राईम पोलिसांनी दक्षिण-पश्चिम दिल्लीतील एका प्रकरणात मोठी कारवाई करत श्रीगोंदा, शिवाजीनगर येथील जायकर नावाच्या इसमाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जायकर याच्यावर भारतीय दंड संहितेच्या ३१८(४) आणि ३१९(२) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्ली सायबर क्राईम पोलिस स्टेशनमध्ये १८ नोव्हेंबर २०२४ रोजी फिर्यादीच्या तक्रारीनंतर संबंधित गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नसला तरी जायकर याच्यावर ऑनलाइन फ्रॉडचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

श्रीगोंदा परिसरात सकाळपासूनच दिल्ली पोलिसांच्या कारवाईची चर्चा सुरू होती. सुरुवातीला या कारवाईमागचे नेमके कारण स्पष्ट नव्हते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, जायकर याला दिल्लीतील सायबर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading