श्रीगोंदा पोलिसांकडून दान पेटी चोरी प्रकरणाचा छडा; आरोपी २४ तासांत गजाआड, १००% मुद्देमाल हस्तगत..

दिनांक १९ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:

मांडवगण येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी व तिच्यातील रोख रक्कम चोरी प्रकरणाचा श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला असून आरोपीस अटक करून १००% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक १६ डिसेंबर रोजी रात्री १०:४५ वाजताच्या सुमारास मांडवगण येथील सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची तक्रार मंदिराचे पुजारी व ट्रस्टी पोपट गणपत खराडे (वय ७३) यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीनुसार, अंदाजे २०० रुपयांची लाकडी दानपेटी व त्यामधील १५,००० ते १७,००० रुपयांच्या दरम्यानची रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

गुन्ह्याच्या तपासाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तपासासाठी नियुक्त करण्यात आले. तांत्रिक तपासाद्वारे आरोपी बाळू वसंत घोडके (वय ४१, राहणार महाडुळवाडी, मांडवगण) याचा शोध घेतला गेला. तपासादरम्यान, आरोपी गावच्या शिवारात सापडला. त्याला १७ डिसेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

पोलिसी चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली आणि चोरीस गेलेली २०० रुपयांची दानपेटी व तिच्यातील १७,६०० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे व पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. तपास पथकात पोलीस हवालदार आनंद मैड, संदीप राऊत, सचिन गोरे, संदीप शिरसाठ, संदीप जाधव, संदीप अजबेफारुक मण्यार योगेश भापकर  तसेच मोबाईल सेल दक्षिण विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू व नितीन शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या यशस्वी कारवाईसाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, व उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांचे मार्गदर्शन लाभले..

स्रोत:(पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा पोलिस ठाणे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading