दिनांक १९ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:
येथील एका आदिवासी महिलेने पोलीस निरीक्षकांवर तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला आहे. संबंधित महिला ही श्रीगोंदा येथे राहते. तीने आपल्यावर झालेल्या अत्याचार व धमकी प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यावर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २:०० वाजता नमूद महिलेच्या घरी अनिल लोखंडे, श्रीगोंदा हा बचत गटाच्या कागदपत्रांच्या कामासाठी आला. त्यावेळी त्याने या महिलेशी जवळीक करत तिच्यावर बलात्कार केला व त्याचे फोटो काढले. या प्रसंगातून पीडित आदिवासीं महीला कशीबशी सुटली.. मात्र, त्यानंतर लोखंडे पुन्हा आपल्या पत्नीसह त्या महिलेकडे गेला आणि तिला शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली.

महिलेची मागणीः
“एक आदिवासी महिला म्हणून माझ्या सोबत घडलेल्या गंभीर घटनेला योग्य न्याय मिळावा, असे मला वाटते. पोलीस प्रशासनाने तक्रार नोंदवून संबंधित इसमांवर कठोर कारवाई करावी,” असे तीने माध्यमांना सांगितले.

या प्रकारामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पीडितेला न्याय मिळावा, अशी अपेक्षा श्रीगोंदा परिसरातील जनतेतून व्यक्त होत आहे. या गंभीर घटने बाबत पोलीस निरीक्षक व स्थानिक पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्यास..! या गंभीर घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यासंदर्भात प्राणांतिक उपोषण सुरू करणार असल्याचेही पीडित कुटुंबाने नमूद केले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

