मिशन गर्ल्स हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न..
दिनांक २६ जानेवारी,श्रीगोंदा:
काल दिनांक २५ जानेवारी रोजी मिशन गर्ल्स हायस्कूल येथे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुंडलीकराव दरेकर, विठ्ठलराव वाडगे,(नगरसेवक) निसार बेपारी (नगरसेवक )महेश लांडे,(नगरसेविका) सोनाली घोडके,(नगरसेवक) संग्राम घोडके,(कैकाडी समाज संघटना अध्यक्ष)बापू माने,संतोष बोळगे,सह श्रीमती.शुभांगी लगड हे कार्यक्रमासाठी हजर होते.
उपस्थित मान्यवरांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्रीमती सुरेखा भालेराव यांनी स्वागत केले. सुत्रसंचालन श्री.शिंदे सर,घोडके सर,वागस्कर सर, यांनी केले.आभार श्री.सतीश भालेराव यांनी मानले.हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.