पदोन्नतीचा आनंद आदिवाशी विद्यार्थ्यांना अन्नदान करून केला साजरा..

दिनांक २८ जानेवारी,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यात पोलीस दलात कार्यरत असलेल्या शमुवेल गायकवाड यांची काही दिवसांपूर्वी हेड कॉन्स्टेबल(विशेष शाखा,अधीक्षक,कार्यालय अहमदनगर)पदावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली.त्यांच्या कार्याची दखल घेत वरिष्ठांनी त्यांची नेमणूक वरच्या पदावर केली.त्यांच्या नियुक्तीनंतर सहकारी पोलीस मित्र,अधिकारी,पत्रकार व सामाजिक,राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी गायकवाडांचे मनोमन अभिनदन केले.गायकवाड यांनीही सर्वांचे आभार मानले होते.
मात्र,हा आनंद वंचित असलेल्या समाज घटकांसमवेत साजरा करण्याची गायकवाड यांची इच्छा होती.त्यानुसार त्यांनी दिनांक २६ जानेवारी रोजी प्रजसत्ताक दिनाचे औचित्य साधत घुगलवडगाव येथील महामानव बाबा आमटे संस्थेच्या वसतिगृहातील मुलांमध्ये आपले काही जवळचे मित्र बरोबर घेत,येथील वंचित मुलांसोबत वेळ घालवला.त्यांना मिठाई व खाऊ देत पदोन्नतीचा आनंद द्विगुणीत केला.समजा प्रवाहा पासून दूर असलेल्या या लहान मुलांना शिक्षण मिळण्यासाठी धडपडणाऱ्या अनंत झेंडे यांच्या कार्याला जाणून घेत,येथील मुलांसोबत काही वेळ घालवल्याने आत्मिक समाधान मिळाले असल्याचे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक)शमुवेल गायकवाड यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
या प्रसंगी भगवान आबा गोरखे,शांतीलाल मदने(बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष),(पत्रकार)पीटर रणसिंग,पवार(वडार संघटना,जिल्हाध्यक्ष),अविनाश घोडके(सामाजिक कार्यकर्ते),संस्थेचे अनंत झेंडे, बारबोले ताई,काळे.यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.उपस्थित सर्वांनी शामुवेल गायकवाड यांच्या सह अनंत झेंडे यांच्या पुढील कार्यास शुभेच्या दिल्या आहेत.

img-20200127-wa00471325947501657354413.jpg
महामानव बाबा आमटे संस्थेतील मुलांसोबत चे काही छायाचित्रे

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading