बेशिस्त वाहन चालक व अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यास देणे पालकांना पडले महागात..

दोन दिवसांत ३२६००/- रूपये दंड वसुल

श्रीगोंदा पोलीसांची यापुढे ही वाहन चालकांवर राहणार करडी नजर..पो.नि.जाधव..

दिनांक २८ जानेवारी, श्रीगोंदा:
बेशिस्त् वाहन चालवणे,विना लायसन गाडी चालवणे,गाडीचे कागदपत्र नसणे,अल्पवयीन मुलास गाडी चालवण्यास देणे,दारू पिवुन गाडी चालवणे तसेच विनाकारण कॉलेजचे कॅम्पसमध्ये फिरणे, धिंगाणा घालणे.या सर्व प्रकारावर आळा बसावा याकरीता श्रीगोंदा पोलीस स्टेशनकडुन बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्याची मोहिम सुरू झाली असुन,ही कारवाई सतत चालु राहणार आहे.
दिनांक २५जानेवारी रोजी काष्टी ता.श्रीगोंदा येथे १०१ वाहनावर कारवाई करून २१४००/- रूपये दंड आकारण्यात आला आहे.तसेच दिनांक २७ जानेवारी रोजी पेडगाव चौक,श्रीगोंदा येथे ५७ वाहनांवर कारवाई करून ११२००/- रूपये दंड आकारण्यात आला आहे.अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यास दिल्याने त्यांचे पालकांवर मोटार वाहन कायदा कलम ५/१८० प्रमाणे३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदर कारवाई मध्ये यापुढे अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यास देणे हे पालकांच्या चांगलेच अंगलट येणार असुन, मोटार वाहन कायदा कलम ५/१८० प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.सदर गुन्हयात ३ महिणे कारावासाची शिक्षा आहे.
सदरची संपुर्ण कारवाई श्री.सागर पाटील सो.(अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर), श्री.संजय सातव सो.(उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग)यांचे मार्गदर्शनाखाली,श्री.दौलतराव जाधव(पोलीस निरीक्षक श्रीगोंदा),(सपोनि.)सतिष गावीत, (सपोनि),विठ्ठल पाटील,(सपोनि.)रांजेद्र सानप,(पोसई)अमित माळी,(पोकॉ.)प्रताप देवकाते,(पोकॉ) कुलदिप घोळवे,(पोकॉ.)दादासाहेब टाके, (पोकॉ.) रमाकांत परीट,पोकॉ.अमोल कोतकर,पोकॉ.अनिल साठे,(पोकॉ.)गोकुळ इंगवले,(पोकॉ.)रवी जाधव, (पोकॉ.)समीर सय्यद यांनी केली आहे.
या कारवाईमुळे सर्व सामान्य जनतेकडुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.सदर मोहिम सतत चालु राहणार असुन,कॉलेज कॅम्प्स मध्ये विनाकारण फिरणारे,रस्त्यावर धिंगाणा करणारे तसेच स्टंट करणारे यांचेवर पोलीसांची करडी नजर राहणार आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading