पत्रकार राजेंद्र घोडके यांना पितृशोक..

दिनांक २ फेब्रुवारी मांडवगण,श्रीगोंदा :
मांडवगण येथिल पत्रकार राजेंद्र घोडके यांचे वडील शंकरआण्णा निराजी घोडके यांचे दिनांक १ फेब्रुवारी रोजी वृध्दपकाळाने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी ते ८२ वर्ष्याचे होते.
ते स्वभावाने शांत आणि समयी होते.त्यांच्या पार्थिवावर महाडुंळेवाडी येथे दुःखद अंतःकरणाने अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात(पत्रकार)राजेंद्र घोडके,(माजी ग्रामपंचायत सदस्य)उत्तमराव घोडके आणि(दहिगाव, साकत सेवा सोसायटीचे सचिव)शाहूराज घोडके यांच्यासह पाच मुले एक मुलगी,जावई ,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading