गुटखा निर्मिती व विक्री करणाऱ्यांना बसणार चाप, सरकारने उचललं कठोर पाऊल..
व्हायरल न्यूज:
दिनांक ८ फेब्रुवारी,मुंबई:
राज्यात गुटखा बंदी असताना अवैधरित्या गुटखा निर्मिती केली जात आहे. एवढेच नाही तर गुटख्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गुटखा निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर आता मोक्का लावणार आहे. तब्बल सात वर्षे झाले तरी गुटखा – बंदीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याने सरकार कठोर पावलं उचलत आहे.
२०१२ मध्ये आघाडी सरकार असताना राज्य सरकारने राज्य गुटखा मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. पण बाहेरच्या राज्यातून गुटखा महाराष्ट्रात येत असल्यामुळे गुटखा विक्री होत आहे. याला आळा बसवण्यासाठीच राज्य सरकार गुटखा आणणारे आणि विकणारे यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करणार आहे. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संकेत दिले आहेत.
त्याशिवाय गुटखा आणि दारूची जाहिरात कायद्यानुसार करता येत नाही. तरीही त्याच ब्रँडचे इतर उत्पादन बनवून त्याच्या जाहिराती दाखवल्या जातात. त्यावर ही बंदी आणण्याचा विचार सरकार करत आहे. पुढच्या काळात अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीने या बाबतीत अधिक कठोर पावले उचलले जातील.अशी माहिती अन्न आणि औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. २०१२ पासून ते २०१९ पर्यंत २२६ कोटी ५३ लाख गुटखा जप्त करण्यात आला.तर,एकूण ६२०६ इतकेच खटले दाखल करण्यात आले.म्हणून,गुटखा साठा करणारे आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत सरकार गंभीर आहे.
(अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालययाकडून मिळालेल्या माहितीनुसार)
* जो गुटखा घेऊन येतो, त्या वाहन चालकाचे लायसेन्स रद्द करणार.
* २०१२ गुटखाबंदी करणारे एकमेव राज्य आहे.
* मँग्नीशिअम कोर्बोनेट हा घटक गुटख्यात महत्वाचा.
* २०१२ ते २०१९ या काळात २२६ कोटी ५३ लाख किमतीचा गुटखा पकडला.
* कारवाया केल्या जातात, पण शिक्षेची तरतूद कमी.
* कोटी रुपयांचा गुटखा जप्त, FIR झाल्या पण जामीन लवकर मिळतो.
* गुटखा साठेबाजांवर मोक्का लावण्याबाबत विचार सुरुये.
* गुटखा आणि दारूच्या अप्रत्यक्ष रित्या जाहिराती दिल्या जातात.
* त्यातून दिशाभूल होते, त्या बंद करण्याबाबत प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे देण्यात आला आहे.