रमाईच्या त्यागामुळे महिला सुरक्षित :प्रशांत चव्हाण.
रमाईच्या अथक त्यागामुळे भारतीय महिला सुरक्षित आहेत. अशे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष प्रशांत चव्हाण यांनी केले.
दिनांक ८ फेब्रुवारी, श्रीगोंदा:
७ फेब्रुवारी रोजी माता रमाई भिमराव आंबेडकर यांची १२२ वी जयंती आकाशगंगा कॉलनी श्रीगोंदा येथे आयोजीत केली होती.त्यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. प्रा.भोसले सर होते.चव्हाण पुढे म्हणाले माता रमाईने डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी आपले स्वत : चे चार अपत्ये गमावली व आपल्या साहेबांना बॅरिस्टर केले .या रमाईच्या त्यागाची जाणीव ठेवून बाबासाहेबांनी संविधानामध्ये महिलांसाठी विशेष अधिकार दिले व त्यामुळे आज समस्त महिलांनी सर्व श्रेत्रात प्रगती करून सुरक्षित आहेत .यावेळी.कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली.अंकिता चव्हाण हिने होय मी सावित्री जोतीराव फुले बोलते या विषयावर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव आयु.सतीश ओहोळ सर यांनी केले.तर आभार केंद्रप्रमुख आयु.दिलीप घोडके सर यांनी मानले. यावेळी उपस्थित महिलांचा सत्कार सुचिता चव्हाण यांनी रमाईचे पुस्तक देऊन केला यांनी केला. भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष आयु. राजू ओहोळ,आयु.रावसाहेब घोडके यांचे सह महिला उपस्थित होत्या.