तालुक्याचे वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे तहसील कार्यालय आज साप निघाला म्हणून गडबडून गेले.मेहरबानी आज दुसरा शनिवार हा सुट्टीचा दिवस असल्याने,साधारण माणसांची वर्दळ कमी होती.फुटलेल्या काचा आणि वाढलेले गवत यात वावरत असलेले साप व इतर सरपटणारे प्राणी थेट श्रीगोंदा तहसील कार्यालयात पोहचल्याने कर्मचाऱ्यांचे हातपाय थंड झाले.
आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात कार्यालयीन कर्मचारी कार्यरत असताना.अचानक अडीच-तीन फुटाचा साप दिसल्याने कर्मचारी गडबडून गेले. कसेबसे त्याला बाहेर काढीत सर्पमित्रांना बोलावून सापाला पकडण्यात आले. याविषयी पुरवठा विभागातील अधिकारी दत्तात्रय साळुंके व त्यांचे सहकारी तसेच तालुक्यातील कामानिमित्त आलेल्या काही लोकांची कार्यालयात साप बघून भंबेरी उडाली. या सापापुढे पाय व काठ्या वाजवत त्याला कार्यालयातून बाहेर काढले.नंतर, सर्प मित्राच्या मदतीने त्याला पकडण्यात आले.अडीच-तीन फुटाचा हा साप विषारी असल्याचे सर्पमित्राने मंदिलकर याने यावेळी सांगितले.सापाला पकडुन मोकळ्या रानात सोडण्यात येणार असल्याचे त्यांने सांगितले आहे.