अहमदनगर जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे, मुख्यमंत्र्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक द्यावा.
व्हायरल न्यूज:
दिनांक ११ फेब्रुवारी, कर्जत:
अहमदनगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक हे पद रिक्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. कर्जत येथील काराग्रह मधून ५ गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेल तोडून पळून गेले आहेत. गुन्हेगारी कारवायांनी डोके वर काढले आहे. तर महिला व मुली यांच्यावरील अत्याचारांच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने नगर जिल्ह्याला चांगल्या दर्जाचा पोलीस अधीक्षक द्यावा अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
कर्जत येथील कारागृहामधून ५ कुविख्यात आरोपी जेल तोडून पळून गेले आहेत. या आरोपींच्या शोधासाठी सात पोलीस पथके रवाना झाली आहेत. अशी माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी दिली.
पळून गेलेल्या आरोपींची छायाचित्रे देखील पोलिसांनी प्रकाशित केली आहेत. कर्जत येथील कारागृहामधून पाच आरोपींनी संध्याकाळी साडेसात वाजता कारागृहामधील छताची प्लायवूड त्याच्यावर असलेले गज आणि वरती असलेली कवले हे काढून शेजारील भिंतीवरून उड्या मारून पलायन केले.
या घटनेनंतर नगर जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली. रात्री घटनास्थळी प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व तहसीलदार छगन वाघ यांनी भेट दिली. पाहणी केली या आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके राज्यात रवाना करण्यात आली असून पोलीस या आरोपींचा कसून तपास करत आहेत. कर्जत सब जेल मधून पाच आरोपी पळून गेले आहेत. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सात पोलीस पथके तयार करून आरोपींचा कसून तपास लावण्याचे काम सुरू आहे.