इयत्ता ९ वितील मुलीला,लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या,इसमावर पॉक्सो सह ॲट्रॉसिटी नुसार गुन्हे दाखल…

दिनांक ११ फेब्रुवारी(श्रीगोंदा कारखाना,श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यातील फॅक्टरी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मागासवर्गीय मुलीला,शेजारी राहणारा गणेश संतोष ढवळे याने वारंवार लग्नाचे अमिष दाखवीत,छेडछाड व जबरदस्तीने गाडीवर बसवुन निर्जन स्थळी नेत विनयभंग केल्या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीनुसार आरोपीवर पॉक्सो सह ॲट्रॉसिटी नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या एक वर्षापासून गणेश ढवळे हा त्याच्या घरा शेजारी वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन नववीतल्या मुलीशी लगट करान्याचा प्रयत्न करीत होता.माझे तुझ्यावर प्रेम आहे,मला तू आवडते,मला तुझ्याबरोबर लग्न करायचे,म्हणत वारंवार छेडाछेडी करण्याचा प्रयत्न करायचा. घरच्यांना कळवल्यास जिव देईन अशी मुलीला धमकीही त्याने दिली होती.
सदरील प्रकरण घरच्यांना समजल्यास बदनामी होईल. या उद्देशाने पीडित मुलींने प्रकरण दाबून ठेवत,त्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला.मात्र,त्या मुलाचे छेडछाडी करने थांबले नाही.उलट दिनांक १० फेब्रुवारी रोजी मुलगी नियोजित वेळी शाळेत जाण्यास निघाली असता,तिला जबरदस्तीने मोटर सायकलवर बसवून,घारगाव परिसरात निवांत ठिकाणी नेऊन, तिच्याशी झटापटी करीत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
या पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गणेश ढवळे याचे वर भादवि कलम ३६३,३६६(A),३५४,३५४(D),५०६,बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७ व ८ तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(r),३(१)(s),३(१)(w),३(१)(i) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव हे करीत आहेत..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading