बहुजन पूर्वीचे बौद्धच: जगदीश गवई..

दिनांक ११ फेब्रुवारी,अहमदनगर:
बहुजन पूर्वीचे बौद्धच होते.असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस जगदीश गवई यांनी केले.भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने आयोजीत एकता धम्म परिषदे मध्ये आज प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.गवई पुढे म्हणाले,सम्राट अशोका पासून ते छ्त्रपती संभाजी महाराजां पर्यंत सर्व राजांवर बौद्ध धम्माचा प्रभाव होता. सम्राट अशोकांच्या काळात ८४ हजार स्तुप निर्माण केले.सर्वांनी बौद्ध संस्कृतीचे जतन करणे आपणा सर्वांची जबाबदारी असल्यांचे त्यांनी यावेळी सांगितले .
११/२/१९३६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिद्धार्थ वसतीगृह येथे आले होते.याचे औचीत्य साधून धम्म परिषदेचे आयोजन केले होते.यावेळी स्मरनिका प्रकाशन व उत्तकृष्ठ काम करणाऱ्या व्यकीस धम्म पुरस्कार देवून गौरवीत कारण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी (जिल्हाध्यक्ष) भगवंत गायकवाड होते.
यावेळी मंचाकर(राष्ट्रीय खजीनदार)अरूण साळवे.(राष्ट्रीय सचिव)अँँड.एस .एस .वानखेडे,(महाराष्ट्र अध्यक्ष)यू.जी.बोराडे,(महाराष्ट्र खजीनदार) विजय कांबळे उपस्थित होते.
उपस्थिताचे स्वगात विजय कांबळे यांनी केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र साळवे यांनी केले आभार विजय मेडे यांनी मांडले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading