श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव येथे मोफत बाल आधार शिबीराचे आयोजन मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आले.
यामध्ये पाच वर्षातील जवळपास १७५ बालकांचे आधार कार्ड काढण्यात आले.पेडगांव ग्रांम पंचायतीने श्रीगोंदा तहसिलदारांकडे आधार शिबीराची मागणी केली होती.त्यानुसार या शिबीरामध्ये पाच कर्मचारी व जि.प.शाळा अंगणवाडी सेविकांनी मोठया संखेत सहभाग घेतला होता.पेडगाव सह शेडगांव,चोराची – वाडी,शंकरनगर,अजनुज,नवनाथनगर,कणसेवाडी,आधोरेवाडी,आदी गावांमधील बालकांचे आधार कार्ड काढण्यात आले.