सौ.धनश्री विखे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीगोंद्यातील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न..

दिनांक १५ फेब्रुवारी श्रीगोंदा:
१४ ते १७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन सौ.धनश्री विखे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज पार पडले. यावेळी आमदार बबनराव पाचपुते यांच्या सह डॉ.प्रतिभा पाचपुते,धनसिंग भोईटे,(पोलीस निरीक्षक)दौलतराव जाधव,सदाण्णा पाचपुते,(चंद्रमा उद्योग समूहाच्या)संगीता जगधने,प्रतिभा झिटे,(भाजपचे माजी तालुकाध्यक्ष)बाळासाहेब महाडिक, वैभव पाचपुते,वाबळे इव्हेंटचे भाऊसाहेब वाबळे, विजय शेलार(सर)सुभाष दादा डांगे,(प्राध्यापक) तुकाराम दरेकर,(डॉक्टर)स्मिता तरटे (संभाजी ब्रिगेडचे)टिळक भोस,(माजी उपनगराध्यक्ष)बापूशेठ गोरे,सतीशशेठ पोखरणा,नंदकुमार कोकाटे,(माजी नगराध्यक्ष)मनोहरदादा पोटे,(तालुका आरोग्य अधिकारी)म्हस्के,(नगरसेवक)अंबादास औटी,सतीश मखरे,संतोष खेतमाळीस,संतोष क्षीरसागर,अशोक खेंडके,अरविंद कापसे सह विविध गावांतील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी आपल्या प्रमुख भाषणात बोलताना धनश्री विखे यांनी मनोगत व्यक्त केले.त्यांनी भारत देश हा कृषीप्रधान देश असल्याचे नमूद केले.शेतकऱ्यांच्या कष्टामुळे आपल्या देशाला शेतीप्रधान देश म्हणून ओळखले जाते.मात्र जगाच्या पोशिंद्याचे हाल बिकट झाल्याचे,यावेळी विखे ताईनीं विशेष नमूद केले. शेतकरी पीक पिकवत आहे.मात्र,पिकं विकली जात नाहीत.पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने, शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.स्वतःच्या घरात अन्न नसल्याने कर्जबाजारी होऊन तो आत्महत्या करीत आहे.निसर्ग साथ देत नसल्याने या सर्व गोष्टी शेतकऱ्यांबरोबर घडत असल्याचे,त्यांनी नमूद केले आहे.सेंद्रिय खतांचा वापर करण्यासाठी या कृषी प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे विक्रेते उपस्थित आहेत.साधारण व्यक्तीने कृषी प्रदर्शनात येत वेगवेगळ्या शेती उपयोगी बाबी जाणून घ्यायला हव्यात.आधुनिक तंत्रज्ञान व शेती उपयोगी वस्तू एकाच जागी मिळतात.त्याचा लाभ घेण्याचेही त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना माजी मंत्री,आमदार बबनराव पाचपुते यांनी इतर तंत्रज्ञानाबरोबर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले आहे. पाण्याची बचत करीत उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे,शिवाय बाजारात विकते तेच आपल्या जमिनीत पिकवन्याचा शेतकऱ्याने विचार केला पाहिजे.असेही त्यांनी यावेळी नमूद केले. पूर्वीपेक्षा लिंबू उत्पादनामध्ये तालुका जिल्ह्यात अग्रेसर असल्याने,येथील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.नियोजनबद्ध शेती केल्याने श्रीगोंद्यातील काही भागातील डाळिंब,द्राक्ष,ऊस व लिंबू उत्पादनात तालुक्याने नाव लौकिक मिळला आहे.वैभव पाचपुते व वाबळे यांनी कृषी प्रदर्शन आयोजित केले म्हणून, बबनराव पाचपुते यांनी त्यांचे आभार मानले असून, तालुक्यातील शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
(काही छायाचित्रे)..

Leave a Reply