महाराजा कॉलेज कबड्डी स्पर्धेत चतुर्थ क्रमांकावर, खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी..

दिनांक २४ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:

कर्जत तालुक्यातील निंबोडी येथे आयोजित भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेत महाराजा जिवाजीराव शिंदे विद्यालयाच्या कबड्डी संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. या स्पर्धेत खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आणि कॉलेजचे नाव उज्ज्वल केले.

कॉटर फायनलमध्ये महाराजा कॉलेजचा सामना धस दादा आष्टी संघाशी झाला. अत्यंत रोमांचक खेळात, महाराजा कॉलेजच्या खेळाडूंनी चार गुणांनी विजय मिळवला. यानंतरच्या सेमी फायनलमध्ये पुणे संघाशी संघर्ष झाला, जिथे खेळाडूंनी अपार मेहनत आणि संघर्षाने सेमी फायनलमध्ये स्थान मिळवले.

स्पर्धेत सोमनाथ जांभळे, महेश रंधवे, युवराज कापसे, जुबेर बागबान, ऋषी भिसे, हर्षद कोथिंबिरी, आर्यन मचे, श्रेयस मेत्रे, निखील पवार, करण हराळ, आणि शैलेंद्र निषाद या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत चतुर्थ क्रमांकावर विजय मिळवला. त्यांच्या या यशासाठी क्रीडा संचालिका कल्पना बागुल, क्रीडा शिक्षक संजय डफळ, संतोष जाधव, आणि कोच हर्षद चौकडे यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.

या यशस्वी कामगिरीबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन बबनराव पाचपुते, सदस्य बाबासाहेब भोस, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुल जगताप, महावीर पटवा, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव जरे साहेब, उपप्राचार्य साळवे सर, जिमखाना विभाग प्रमुख अहिवळे सर, उपप्राचार्य मखरे सर, कॉमर्स विभाग प्रमुख भुजबळ सर, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे आणि सर्व विभाग प्रमुख, शिक्षक वर्ग व इतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्रोत:(प्रसिध्दी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading