महसूल,पोलीस आणि आरोग्य विभागाच्या सुरक्षेसाठी ५१ हजार रुपयांचा निधी तहसिलदार महेंद्र माळी यांना सुपूर्त..

दिनांक २ एप्रिल,श्रीगोंदा:

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध संघटना, समाजसेवक पुढे येत असतानाच, श्रीगोंदा शहरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती अबई काशिनाथ तिखे यांनी मास्क व सुपररब कंपनीचे सेनिटायजर असा ५१ हजार रुपयांचा निधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्रीगोंद्याचे तहसिलदार महेंद्र माळी यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

कोरोना हा जीवघेना विषाणू अहमदनगरमध्ये पसरत असून,रुग्णांची वाढती संख्या चिंतेचे कारण बनलेली आहे. यात महसूल प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी जीव धोक्यात घालून,कोरोनाशी दोन हात करत असतांना,त्यांची सुरक्षा ही महत्वाची आहे.

परप्रांतीय मजूर व नागरिकांना श्रीगोंदा शहरामध्ये आसरा मिळवून देण्यात प्रशासनाने महत्वाची भूमिका बजावली आहे. या सर्वांची कोरोनापासून सुरक्षा व्हावी.या सामाजिक जाणीवेतून सेवा – निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती अबई काशिनाथ तिखे यांनी मदत देण्याची कामना व्यक्त केली.

त्यानुसार महसूल विभागाशी संपर्क साधत गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी मास्क व सुपररब कंपनीचे सेनिटायजर औषधे असा ५१ हजार रुपयांचा निधी महसूल प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभाग यांच्या कडे सुपूर्त केला.

यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर, पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे पो.कॉ. अविनाश ढेरे, संतोष कोपनर यांच्यासह पुरवठा निरीक्षक पाचारणे, शिवाजी काशिनाथ तिखे, मीराताई शिंदे, राजेंद्र राऊत, शैलेंद्र सांगळे आदि मान्यवर उपस्थित होते.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading