दिनांक ३ एप्रिल,अहमदनगर:
दिवसेंदिवस करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे.अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा गुरूवारी करोना बाधित रूग्णांची संख्या १४ झाली, संक्रमित लोकांच्या थेट संपर्कात आलेल्यां लोकांची संख्या ३८८ इतकी झाली आहे.
यावर जिल्हा प्रशासनामार्फत कठोर पावले टाकली जात आहेत.सविस्तर वृत्त असे की, नगर जिल्ह्यात आता पर्यंत १ लाखाहून अधिक नागरिकांच्या हातांवर शिक्के देऊन त्यांना होम क्वारंटाईन केल्याने जिल्ह्यातील वातावरण गंभीर बनले असल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार पारनेर तालुक्यात ११ हजार ७२८,कोपरगाव मध्ये ४ हजार ३८८,पाथर्डीत ११ हजार १८,शेवगाव ६ हजार ७१५,नगर तालुक्यात ६ हजार,नेवासे तालुक्यात ६ हजार १२१, अकोले तालुक्यात ११ हजार ५८०,श्रीगोंदा तालुक्यात ११ हजार २००,राहाता १ हजार ४३९,श्रीरामपूर २ हजार, संगमनेर मध्ये ७ हजार ७९५,कर्जत तालुक्यात १० हजार ९४ व जामखेड तालुक्यात १० हजार ७८५ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
त्यानुसार सध्या अ.नगर जिल्ह्यात १ लाख ५ हजार ४०१ जन होम क्वारंटाईन आहेत.विशेषत: लॉकडाऊनमुळे शहरांमधून गावांकडे व परदेशातून परत आलेल्या लोकांना जिल्हा प्रशासनाने होम क्वरंटाईन केलेले आहे.या सर्वांना १४ दिवस घरात थाबणे बंधनकारक केले असून, स्थानिक प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी या सर्वांवर लक्ष ठेऊन आहेत.
नगर जिल्ह्यात १३ मार्च रोजी करोना संक्रमित प्रथम रूग्ण निदर्शनास आला होता.त्यानंतर आजपर्यंत जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या १४ पर्यंत पोहोचली आहे.२ एप्रिल रोजी करोना बधितांची संख्या अचानक ६ ने वाढल्याने जिल्ह्यातील स्थिती गंभीर होत असल्याने पुढील कालावधीत लॉकडाऊनचे सक्तीने पालन करावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
(वृत्तसंस्था)
