डाळिंब उत्पादकांना ६ कोटी ३९ लाख ८३ हजारांचा विमा मंजूर: आ.बबनराव पाचपुते..

दिनांक १० नोव्हेंबर,श्रीगोंदा:

डाळिंब उत्पादकांना ६ कोटी ३९ लाख ८३ हजार रुपयांचा विमा मंजूर झाल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ६ कोटी ३९ लाख ८३ हजार ६५० रुपयांचा आंबिया बहार २०१९/२० चा विमा मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांशी शेतकरी हे फळबाग व डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी आंबिया बहार २०१९-२० मध्ये डाळिंब या फळ पिकाचा विमा भरला होता. त्या शेतकऱ्यांना आंबिया बहारचा सन २०१९-२० चा विमा मंजूर झाला असून, तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता, त्यांना ६ कोटी ३९ लाख ८३ हजार ६५० रुपयांचा विमा मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिलीआहे.

स्रोत:(संदीप नागवडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading