श्रीगोंदा तालुका माध्यमिक शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी सतीश भालेराव तर सचिवपदी सुनील म्हस्के यांची बिनविरोध निवड..

दिनांक १० नोव्हेंबर,श्रीगोंदा:

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर पुरोगामी संघटनेशी संलग्न असणाऱ्या श्रीगोंदा तालुका माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटनेच्या अध्यक्षपदी सतीश भालेराव यांची तर, सचिवपदी सुनील म्हस्के यांची नुकतीच श्रीगोंदा येथे आयोजित संघटनेच्या वार्षिक सभेत बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

श्रीगोंदा येथील श्री. स्वामी समर्थ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयात संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्य शिक्षकेतर महामंडळाचे उपाध्यक्ष राजू पठाण, संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक समशेर पठाण, जिल्हाध्यक्ष पाराजी मोरे, कोषाध्यक्ष परशुराम वेताळ, जिल्हा सदस्य नंदकुमार कुरुमकर, सतीश ओहोळ आदींच्या उपस्थितीत व अशोकराव आळेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.यावेळी श्रीगोंदा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी सतीश भालेराव तर, सचिवपदी सुनील म्हस्के, कार्याध्यक्षपदी सुरेश जठार, उपाध्यक्षपदी समीर शिकलगार, श्रीरंग साळवे तर खजिनदारपदी विशाल आढाव, आदींसह कार्यकारिणी सदस्यमध्ये पोपट राऊत, सुखदेव सुपेकर, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब लोखंडे ,भाऊ सूर्यवंशी, दगडू केदार, रामभाऊ जांभळे, संतोष शिंदे, अंतु भाेर, राजाराम शेलार, शंकर पवार आदींचा कार्यकारणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सर्व निवडी बिनविरोध पार पडल्या.

यावेळी नूतन तालुका पदाधिकाऱ्यांचा राज्य महामंडळ उपाध्यक्ष राज मोहम्मद पठाण व जिल्हा पदाधिकारी यांनी सत्कार करून संघटना बळकट करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष सतीश भालेराव यावेळी म्हणाले की राज्य महामंडळ व जिल्हा पुरोगामी शिक्षकेतर संघटनेच्या आदेशानुसार श्रीगोंदा तालुका माध्यमिक शिक्षकेतर संघटना अधिक बळकट करण्यासाठी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये लवकरच भेटी देऊन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू, राज्य महामंडळाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील उर्वरित शिक्षकेतर यांना सभासद करून घेण्यासाठी पुढाकर घेणार असल्याचे सांगून माझ्यावर जो जिल्ह्याच्या श्रेष्ठींनी तालुक्यातील शिक्षकेतर बांधवांनी विश्वास टाकला. त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही असे भालेराव यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात जिल्हा उपाध्यक्ष किशोर जामदार यांनी श्रीगोंद्याच्या तालुका संघटनेचा आढावा घेऊन, प्रमुख अतिथींचे स्वागत केले.

नूतन पदाधिकाऱ्यांचे (राज्य महामंडळाचे अध्यक्ष) वाल्मीक सुरासे, (उपाध्यक्ष) राज मोहम्मद पठाण, (ज्येष्ठ मार्गदर्शक) समशेर पठाण, (जिल्हाध्यक्ष) पाराजी मोरे, आदींसह तालुक्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. सूत्रसंचालन सतीश ओहोळ यांनी केले. तर आभार सचिव सुनील म्हस्के यांनी मानले.

स्रोत:(सतिष भालेराव यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading