कूकडी डावा कलव्यावर अनधिकृत व अवैध पाणी उपसा करणाऱ्या विरूद्ध धडक कार्यवाही.
कोळगाव, श्रीगोंदा दिनांक १८ नोव्हेंबर :
कुकडी डाव्या कालव्यातून २५ ऑक्टोबर पासून आवर्तन चालू आहे, या वेळी कुकडी डाव्या कालवा सा.क्र.कि.मी.११० ते कि.मी.१६५ या भागात कालव्यावर अनधिकृत व अवैध पाणी उपसा करणाऱ्या मोटारी चालू होत्या संबंधितांना वारंवार सूचना देऊनही ते कालव्यातून अवैध पाणी उपसा करत होते म्हणून कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ च्या अंतर्गत कर्मचाऱ्यानी संबंधितां विरुद्ध धडक कारवाई मोहीम हाती घेऊन श्रीगोंदा पोलिसांच्या मदतीने दिनांक १७/११/१८ रोजी दुपारी ४ ते पहाटे ४ या वेळात कालव्याच्या बाजूने अचानक छापे घालून सुमारे ३०० मोटारींचे कनेक्शन कापून संबंधितांना समज देण्यात आली व तीस लोकांच्या मोटारी तसेच इतर साहित्य जप्त करण्याची कारवाई केली .
ही कार्यवाही कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता स्वप्नील.व्ही.काळे व कुकडी पाटबंधारे उपविभाग क्रमांक ५ चे उपविभागीय अधिकारी सोळंके यांच्या मार्ग दर्शनाखाली कुकडी सिंचन शाखा क्रमांक १ चे शाखाधिकारी शशिकांत माने व त्यांचे सहकारी एस.के. झुंझरुक,ए.बी.उमाप,सी.बी.शेखरामपालवे,लोखंडे,सी.आर.पांढरे,गपट व सोनवणे यांनी कारवाई केली . यावेळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवार, पोलीस कॉन्स्टेबल भापकर व देवकाते यांनी या पथकास मदत केली.
कोळवडी विभागांतर्गत सिंचन चालू असून कालवा पूर्ण क्षमतेने चालवून सिंचन कालावधी कमीत कमी कसा करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, यादरम्यान सिंचन चाऱ्या ,अवैध उपसा पूर्णपणे बंद ठेवावा लागतो परंतु उपसा चालू असल्याने पूर्ण क्षमतेने सिंचन शक्य होत नाही व त्यामुळे सिंचन कालावधी वाढत जातो यावर उपाययोजना म्हणून शेतकर्यांनी आवर्तन आपल्या भागात नसताना आपल्या मोटारी बंद ठेऊन सहकार्य करावे जेणे करून शेतकर्यांवर कोणतीही कार्यवाही करण्याची वेळ येणार नाही असे आवाहन केले.
(छाया : योगेश चंदन कोळगाव प्रतिनिधी)
