दिनांक २ जून (कोंडेगव्हान,श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हान येथे मुंबई हुन आलेल्या एका ८५ वर्षीय महिलेस कोरोना विषाणू ची लागण झाली असून, श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हान हे गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र (containment zone) घोषित करण्यात आले आहे.त्यानुसार सदर क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान करणे व सदर क्षेत्रातून वाहनांचे आवागमन यास प्रतिबंधित करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार तथा इंसिडन्ट कमांडर महेंद्र माळी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
सदर क्षेत्रातील सर्व आस्थपना, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी दिनांक २ जून २० रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दिनांक १२ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत.
* प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण, वैद्यकीय सुविधा यासाठी डॉ. नितीन खामकर(तालुका आरोग्य अधिकारी)यांची जबाबदारी नोडल प्रतिनिधी म्हणून आहे.कोंडेगव्हान गावातील सर्व नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
* अत्यावश्यक सेवा जसे दूध, किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू याबाबत नियोजन राम जगताप, सहाय्यक गटविकास अधिकारी यांचेकडे सनियंत्रण अधिकारी म्हणून, असणार आहे.
* सदर प्रतिबंधित क्षेत्रासाठी पोलिस बंदोबस्त (पोलीस निरीक्षक) अरविंद माने बेलवंडी यांच्यामार्फत असणार आहे.
* या प्रतिबंधित क्षेत्रामधील व्यक्तीनां आपत्कालीन परिस्थितीत आत किंवा बाहेर जायचे असल्यास त्याचे अधिकार पोलिस निरीक्षक बेलवंडी यांना असतील.सदरचे आदेश हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार देण्यात आल्याचे तहसीलदार माळी यांनी सांगितले आहे.
तालुक्यातील सर्व नागरिकांनी आवश्यकता असेल तरच,घराबाहेर पडावे,असे तहसीलदार श्रीगोंदा तथा इसिडेंट कमांडर माळी यांनी जनतेला आवाहन केले आहे.
