पो.नि.दौलतराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन..

दिनांक २ जून,श्रीगोंदा :

आज २ जून मंगळवार रोजी दक्ष नागरिक फाऊंडेशन व श्रीगोंदा वकील संघ आयोजित तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भव्य रक्त दान शिबीर आयोजित केले होते.

याप्रसंगी श्रीगोंदा न्यायालयाचे वरिष्ट न्यायाधिश मा.कुलकर्णी व न्यायाधिश मा.शिंदे उपस्थित राहुन स्वत: रक्तदान करुन, शिबीराचे उदघाटन केले. देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. यामुळे रक्ताचा तुटवडा भासतो आहे. त्या निमित्ताने सामाजिक भान ठेवुन, गरजू रुग्णास रक्त किंवा प्लाझ्मा आदी घटकांची गरज पुर्ण करुन हातभार लावण्याच्या दृष्टीने भव्य रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

दोन महिन्यांपासुन दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या माध्यमातुन कोरोना विषाणु फैलाव रोखण्यासाठी जनजागृती करण्यात आली. दक्षच्या मध्यमांतुन २ जिल्हे, ५ तालुके, १४८ गावे व २६० ठिकाणी जावुन जनजागृतीचे कार्यक्रम करण्यात आले. दक्ष नागरिक फाऊंडेशन ही संस्था नेहमीच सामाजिक व प्रशासकिय क्षेत्रात अग्रेसर राहून काम करत आहे. यावेळी बोलतांना मा.न्यायाधिश व पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांनी अध्यक्ष दत्ताजी जगताप व दक्षच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी (एपीआय) सतिष गावित साहेब, कॉ.संजय काळ, अँँड.संदिप कावरे (अध्यक्ष-श्रीगोंदा वकील संघ), अँँड.रोहित गायकवाड, अँँड.राम काळे, अँँड.प्रसाद इंगळे, अँँड.इनामदार आदींनी व व्यापारी वर्ग, तरुण कार्यकर्ते यांनी रक्तदान करुन, अनमोल सहकार्य केले. जि.प.प्राथ.शाळा मुली,श्रीगोंदा येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबीर यशस्वी होण्यासाठी दक्षचे अध्यक्ष दत्ताजी जगताप, सचिव निसार हकीम, संचालक श्रीरंग साळवे, धनेश गुगळे, समीर पांढरकर, भागवत वायभासे, सतिष पोटे, नारायण ढाकणे आदींनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading