श्रीगोंद्यात ३१ वर्षीय महिलेवर सात वर्षांपासून अत्याचार, अमोल अनभुले विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल..!

दिनांक २२ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरापासून पाच किमी अंतरावर असणाऱ्या एका गावात राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेवर सात वर्षांपासून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपी अमोल नवनाथ अनभुले याच्यावर बलात्कार, फसवणूक, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीच्या गुन्ह्यांतर्गत कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, पीडितेची ओळख आरोपी अमोल अनभुले याच्याशी तिच्या दिराच्या माध्यमातून झाली होती. पीडितेच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या असताना, अनभुले याने तिला सांभाळ करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. त्यानंतर, त्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला आणि तिच्या जातीवरून शिवीगाळ करत धमक्या दिल्या.

महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीकडून तिला दोन अपत्ये झाली. मात्र, तिच्या जातीमुळे अनभुले याने तिला लग्नाचा नकार दिला. यामुळे महिलेने अनेक वर्षं अत्याचार सहन केला. अखेरीस, २१ ऑगस्ट रोजी अनभुले याने पीडितेच्या घरी जाऊन तिला गाव सोडण्याचीच धमकी देत मारहाण केली.

या घटनेनंतर, पीडित महिलेने RPI चे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तर, नमुद प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, बलात्कार आणि अन्य गंभीर गुन्ह्यांखाली अमोल अनभुलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

स्रोत:(फिर्याद)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading