वाढदिवसाचा खर्च टाळून श्रीगोंदा येथील अंगणवाडी परिसराची स्वच्छता; दुर्गंधी व रोगराईला आळा..

दिनांक २२ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:

लक्ष्मी नगर येथील जि. प. ची अंगणवाडी, मागील काही महिन्यांपासून सततच्या पावसामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दूषित परिस्थितीत सापडली होती. परिसरातील गवत भरपूर प्रमाणात वाढले होते आणि साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढली होती, ज्यामुळे दुर्गंधी आणि रोगराई पसरत होती. यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या छोट्या मुलांमध्ये आजारपणाचे प्रमाण वाढले होते.

नगरपरिषदेच्या ओपन स्पेस एरियामध्ये असलेल्या या अंगणवाडीच्या स्वच्छतेसाठी वारंवार पाठपुरावा केला गेला, परंतु निधीअभावी प्रशासनाने साफसफाई करण्यात असमर्थता दर्शवली. या परिस्थितीत, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचा सगळा खर्च टाळून, परिसराची स्वच्छता करून घेतली.

या पुढाकारामुळे अंगणवाडी परिसरातील डासांची संख्या कमी झाली आणि दुर्गंधी व रोगराईलाही आळा बसला. इंजि. जरे यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading