दिनांक २२ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:
शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन श्रीगोंदा तालुक्यातील अधोरेवाडी गावातील तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे उपनेते साजन (भैय्या) पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान अधोरेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच दत्तात्रय अधोरे, ग्रामपंचायत सदस्य जयदीप काळे, प्रशांत गव्हाणे, डॉ.अमित अधोरे, युवानेते वैभव अधोरे, डॉ.सागर ढवळे, प्रदीप अधोरे, ऋषिकेश लकडे, ऋतिक लकडे, राम काळे, सागर औटी, बाबू औटी, विकास लकडे, संदीप औटी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रसंगी शिवसेनेचे (उबाठा) शहर प्रमुख डॉ. सागर कोथिंबीरे, तालुकाप्रमुख किरण कुरुमकर तसेच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या नेतृत्वात आणि उद्धवजी ठाकरे यांच्या दिशादर्शक विचारांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेणाऱ्या या तरुणांनी गावात शिवसेनेचे बळ अधिक वाढवले आहे.
उपस्थित मान्यवरांनी या तरुणांना पक्षप्रवेशाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि शिवसेनेच्या सामाजिक कार्यामध्ये योगदान देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाने अधोरेवाडीतील तरुणांमध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला असून शिवसेनेच्या पुढील वाटचालीसाठी ते सज्ज झाले आहेत.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)





