राजापूरमध्ये दोन सेवा सहकारी सोसायट्यांच्या व्हा. चेअरमन पदासाठी नवे नेतृत्व..

दिनांक २३ ऑगस्ट २०२४,राजापूर, ता. श्रीगोंदा:

राजापूर येथे दोन महत्वपूर्ण सेवा सहकारी संस्थांच्या व्हा चेअरमन पदासाठी निवडणुकीत नवे नेतृत्व समोर आले आहे. राजापूर वि.का.सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान व्हा चेअरमन श्री. माधव एकनाथ शेळके यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर सौ. अंजुबाई धोंडीबा धावडे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच, श्री संत सदाशिव बाबा वि.का.सेवा सहकारी सोसायटीचे व्हा चेअरमन श्री. तुकाराम रंगनाथ वीर यांच्या राजीनाम्यानंतर श्री विठ्ठल दगडु झांबरे यांची निवड करण्यात आली.

या निवडणुकीत राजापूर वि का सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्रीपाद कवास्टे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाचे सदस्य आप्पा रसाळ, युवराज थेऊरकर, शांतीलाल वीर, संजय गव्हाणे, सागर धावडे, रघुनाथ मोरे, राजाराम ढवळे, माधव शेळके, बाळासाहेब शेळके, सर्जेराव वीर उपस्थित होते.

तसेच, श्री संत सदाशिव बाबा वि.का.सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन अशोक वाखारे यांच्यासह संचालक मंडळातील तुकाराम वीर, रामा वीर, सुरेश वाखारे, पांडुरंग वाखारे, कोंडाबाई वाखारे, राजेंद्र लामखडे, अंजना घावटे, सागर मोरे, सुभाष मोहिते हे उपस्थित होते. दोन्ही संस्थांचे सचिव पि.डी. चव्हाण यांनी कामकाजाचे सूत्र हाताळले.

गावातील प्रमुख उपस्थितांमध्ये पंचायत समिती सभापती शंकर पाडळे, काळुराम गवारे, उपसरपंच दिलीप थेऊरकर, बाळु वीर, राणबा धावडे, बाळु धावडे, गोरख पाचर्णे, कॅप्टन विश्वनाथ ढवळे, चेअरमन श्रीपाद कवास्टे, चेअरमन अशोक वाखारे तसेच इतर मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत ही निवडणूक शांततेत पार पडली असून, नव्याने निवड झालेल्या व्हा चेअरमननी संस्थेच्या विकासासाठी नवे उद्दिष्ट ठरवून काम करण्याचे आश्वासन दिले आहे.

स्रोत:(प्रसिध्दी पत्र)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading