एका शेततळ्यावर ३५ एकर फळबागेचा मळा..

मढेवडगाव येथील राजेंद्र आनंदराव शिंदे यांनी अनेक समस्यांवर मात करून वेळू रोडवर एकर पडीक जमीनीवर फळबागांचा मळा अवघ्या एका शेततळ्यावर फुलविला असुन दरवर्षी सुमारे ५५ लाखाचा नफा मिळण्यात यश मिळविले आहे राजेंद्र शिंदे यांचे मन फळांच्या सुगंधी शेतीत रमले आहे.

आनंदराव रामभाऊ शिंदे यांना शिवाजीराव, बापुराव, सुभाषराव, राजेंद्र, कै. चंद्रकांत ही पाच मुल घोड कालव्याखाली मढेवडगाव शिवारात एकर शेती आणि सदस्यांचे कुंटूब सुभाषराव हे नागवडे साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव हे कृषी मंडल अधिकारी व चंद्रकांत हे पुण्यात नामांकित वकील होते त्यांचे दुर्दैवी निधन झाले बापुराव व राजेंद्र यांनी शेती करण्याची जबाबदारी उचलली आनंदराव शिंदे यांना शेतीपेक्षा म्हशी पालन करण्याचा छंद त्यांच्याकडे म्हशीचा गोठा दिवस रात्र आनंदराव यांचे म्हशी कडे लक्ष आहे. वय झाले आहे तरी आनंदराव हातात काठी घेऊन म्हशीच्या मागे असतात.

आनंदराव शिंदे यांनी सन १९९४ च्या दरम्यान श्रीगोंदा शहराजवळ वेळू रोडला मुलांसाठी ३५ एकर शेती खरेदी केली. या शेतीत ज्वारी सोडून काहीच येत नव्हते उन्हाळ्यात शेतकरी फिरकतही नव्हते.

राजेंद शिंदेंचा अश्विनीशी विवाह झाला गौरव व गौरी ही दोन मुलं झाली. आणि ना विज ना पाणी अशी परिस्थिती असताना राजेंद्र यांनी वेळू रोडवरील शेतीचे चेहरामोहरा बदलण्याचे आव्हान स्विकारले आणि वेळू रोडवरील मोकळ्या रानात आपले बिऱ्हाड मांडले शेती डेव्हलपमेंट करण्यासाठी श्रीगणेशा सुरू केला.

सुरूवातीला विज आणली दोन विहीरी चार बोअर टप्याटप्याने घेतले पारगाव सुद्रिक परिसरातील चर्चा करून आठ एकर क्षेत्रात शरद सिडलेस जातीची द्राक्ष लागवड केली. गहू व कांद्याची पिक राहिलेल्या क्षेत्रात घेतली हरण खूप त्रास देत होती. त्यामुळे सर्व क्षेत्र फळबाग लागवडी खाली आणण्याचा निर्णय घेतला त्यासाठी दोन एकरात एक शेततलाव केला. कुकडीचे पाणी मिळू लागले त्यानंतर पाच एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली. तेरा एकरात लिंबोणी लागवड केली पाच एकरात सिताफळाची बाग फुलविली आणि ज्वारी पिकणाऱ्या क्षेत्रात फळबागांचा सुंगध दरवळू लागला आणि राजेंद्र शिंदे यांच्या श्रम आणि नियोजनाचे चीज झाले यांनी राजेंद्र शिंदे यांना शेतीत उल्लेखनीय कामगिरी परिसरातील शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केल्याबद्दल जिल्हा परिषदेने आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यामुळे राजेंद्र शिंदे समाधानी झाले राजेंद्र यांचे शिक्षण अवघे दहावी असताना शेतीत एखाद्या कृषी अधिकाऱ्यापेक्षा शेतीत मोठे ज्ञान अनुभवातून मिळविले आहे.

संदेश

मला शेती करण्यासाठी घरचे पाठबळ होते. पण वेळू रोडवर सुरवातीला शेती करणे एक चालेंज होते हे चालेंज स्विकारले आणि शेती एके शेती हेच ध्येय ठेवले आणि पारगाव मधील अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन फायदेशीर ठरले तरूणांनी शेतीत करिअर करण्याचा निर्णय घ्यावा निश्चित फायदा आहे. पण त्यासाठी नियोजन आणि सातत्य ठेवणे महत्वाचे आहे. राजेंद्र शिंदे, श्रीगोंदा

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.

Leave a Reply