श्रीगोंद्यात हत्यारासह मद्यपी चौघांवर गुन्हा दाखल..

दिनांक ५ डिसेंबर २०२४,श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस स्टेशन अंतर्गत हत्यार संबंधित गुन्हा उघडकीस आलेला आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चार आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा आणि म.दा.कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एक धारधार पाते असलेला कोयता जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी पो.कॉ. योगेश शंकर भापकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ५ डिसेंबर २०२४ रोजी, रात्री १:३० वाजता, काष्टी गावातील शिवनेरी चौकात गाडी तपासणी करत असताना आरोपींनी एक पांढऱ्या रंगाची फोर्ड फिस्टा गाडी चालवताना दिसली. गाडी थांबवून, पोलीस स्टाफ व पंचांसमक्ष गाडी आणि चालकाची झडती घेतली असता, गाडीच्या डाव्या बाजूच्या शिटाखाली एक लोखंडी धारधार पाते असलेला कोयता सापडला.

जप्त केलेल्या हत्याराचे मूल्य १००० रुपये असून, संबंधित वैद्यकीय तपासणी करून ते दारू पिले  असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. आरोपी, प्रविण डोईफोडे (वय २४ वर्षे) व विकाश डोईफोडे (वय २६ वर्षे), हे खळ्याळ गव्हाण, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा याठिकाणचे रहिवाशी आहेत.

या प्रकरणी तपासासाठी पो.नि. किरण शिंदे यांनी पोहेकॉ. गाडगे यांना नियुक्त केले आहे. नमुद प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ व म.दा.कायदा कलम ८५(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

स्रोत:(प्राप्त माहितीवरून)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading