दिनांक ३० नोव्हेंबर २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत प्रचारातून आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. मात्र, काही कळीचे आणि गंभीर मुद्दे अजूनही केंद्रस्थानी आलेले नसले तरी, मतदारांच्या मनात मात्र ते खोलवर रुजलेले आहेत.
विशेषतः एका नगरसेवकाशी संबंधित मागील काही वर्षांपूर्वी घडलेल्या वादग्रस्त घटना आणि त्यावरील सध्याचे नाट्यमय बदल श्रीगोंदा शहरातील सुज्ञ नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण करत आहेत.
मागील काळात, एका विशिष्ट नगरसेवकाविरोधात अनेक गंभीर आरोप झाले होते. यामध्ये, मागासवर्गीय समाजाप्रती रोष व्यक्त करत गाव बंद आंदोलन करण्यात आले होते. यासोबतच, त्यांच्यावर ‘बाई बाटली’ अशा खालच्या पातळीवरचे आरोप झाले. या ‘रंगेल आणि रगिल’ व्यक्तीला नगरसेवक केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त झाली होती.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दूध भेसळ प्रकरणातील अटक झालेल्या लोकांना टार्गेट करून, याचा मुख्य सूत्रधार कोण? असा प्रश्न उपस्थित करत थेट या नगरसेवकाकडे संशयाची सुई वळवण्यात आली होती.
यापेक्षाही धक्कादायक घटना म्हणजे, भ्रष्टाचाराची प्रकरणे माहितीच्या अधिकाराखाली (RTI) बाहेर काढणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यावर याच नगरसेवकाच्या कथित सूचनेवरून एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला होता. विशेष म्हणजे, हल्ला करणारा हा इसम नगरसेवकाच्या रात्रीच्या ‘दारू पार्टी’तील सदस्य होता.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्या सामाजिक कार्यकर्त्यावरच ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी नगरसेवक महोदयांनी कथितपणे ताकद लावली आणि गुन्हा दाखल केला.
या घटनेची वस्तुस्थिती आणि घटना घडवणारा ‘नराधम’ नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर या कृत्याच्या निषेधार्थ मोठी सभा घेण्यात आली होती. या सभेत श्रीगोंदा नगरपालिकेतील नगरसेवक वगळता काही सामाजिक आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

या सभेत हल्ला झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या मित्राने नगरसेवकावर आरोपांची झोड उठवत “दूध भेसळ”, “बाई बाटली”, आणि “दारू पिल्याशिवाय बोलता येत नाही” अशा प्रकारचे अर्वाच्य आणि पातळी सोडून आरोप जाहीरपणे केले होते.
त्या नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी आत्ताच्या साथीदाराने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला होता.
श्रीगोंदा शहरात आता नवा आणि मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. ज्या सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला झाला, ज्याला न्यायिक प्रक्रियेला सामोरे जावे लागले आणि ज्याच्या समर्थनार्थ गाव बंद आंदोलन झाले; तसेच, ज्या मित्राने त्या ‘बेवड्या’ नगरसेवकावर जाहीर सभेत पातळी सोडून आरोप केले आणि दंड थोपटले, तेच दोन्ही व्यक्ती आज त्या नगरसेवकाच्या प्रचारात जाहीरपणे उपस्थित आहेत!
ज्यांनी नगरसेवकास ‘भ्रष्टाचारी’, ‘दूध भेसळखोर’, ‘बेवडा’, आणि ‘लोकहिताचा नाही’ असे संबोधले, त्याच नगरसेवकासाठी ते आता मत मागत आहेत.
या संपूर्ण नाट्यमय घडामोडीमुळे श्रीगोंदा शहरातील सुज्ञ मतदारांमध्ये आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. जनतेसाठी लढण्याचा, भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर काढण्याचा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा दावा करणाऱ्या कार्यकर्त्यांचे हे अचानक झालेले ‘मनपरिवर्तन’ अनेक प्रश्न निर्माण करते:
ज्यांनी हल्ला केला, भ्रष्टाचार केला आणि शहराच्या विकासाला उदास केले, त्यांना मत देणे योग्य आहे का?
गंभीर आरोपांची मालिका असतानाही, विरोधकांनी घेतलेल्या या यू-टर्नमागे नेमके काय कारण आहे?
जनतेच्या हितासाठी लढण्याची भाषा करणारे आज वैयक्तिक स्वार्थासाठी तडजोड करत आहेत का.?
श्रीगोंदा शहरातील नागरिकांनी या सर्व प्रक्रियेचा गांभीर्याने अभ्यास करणे आवश्यक आहे. आपले मत हल्लेखोरावर, दूध भेसळखोरावर, भ्रष्टाचार करणाऱ्यावर किंवा विकासाच्या नावाखाली शहराला भकास करणाऱ्या नेत्याला द्यायचे की नाही, याचे आत्मपरीक्षण करूनच आपला निर्णय घ्यावा लागेल.
स्रोत:(अधिकृत माहिती)
