दिनांक २९ नोव्हेंबर २०२५, श्रीगोंदा:
लोणी (ता. श्रीगोंदा) येथील ‘अजय ज्वेलर्स’ दुकानात २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिवसाढवळ्या झालेल्या सशस्त्र जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) अवघ्या १२ तासांत उघडकीस आणला आहे.
याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील कुख्यात गुंड बबन घावटे याच्यासह दोघांना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे नेकलेस, गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि चारचाकी वाहन, असा एकूण पावणे आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
- बबन भाऊसाहेब घावटे (वय ३३, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा) – मुख्य आणि कुख्यात आरोपी
- कृष्णा पोपट गायकवाड (वय ३५, रा. हिंगणी, ता. श्रीगोंदा)
🏃♂️ फरार आरोपी: - संकेत जाधव (रा. गोलेगाव ता. शिरूर, जि. पुणे)
- करण खरात (रा. हिंगणी, ता. श्रीगोंदा)
फिर्यादी राजेंद्र नागरे (वय ५४) यांच्या ‘अजय ज्वेलर्स’ दुकानात २७ नोव्हेंबर रोजी दुपारी बबन घावटे व त्याचे तीन साथीदार कारमधून आले. आरोपींनी फिर्यादीच्या चुलतभावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पैशांची मागणी केली आणि पिस्तुलाचा धाक दाखवून कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी काचेच्या ट्रेमधून ५ सोन्याचे नेकलेस जबरदस्तीने घेऊन पोबारा केला. - गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तैनात करण्यात आली. आरोपी बेलवंडी फाटा ते श्रीगोंदा रोडने चारचाकी वाहनाने येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. मुख्य आरोपी बबन घावटे याने कृष्णा गायकवाड, संकेत जाधव, करण खरात यांच्यासमवेत गुन्हा केल्याची कबुली दिली.
- 💰 जप्त केलेला मुद्देमाल (किंमत ₹७,७५,०००/-)
- सोन्याचे नेकलेस
- ५ मोबाईल
- एक गावठी पिस्तूल
- २ जिवंत काडतुसे
- चोरीसाठी वापरलेले चारचाकी वाहन
गुंड बबन घावटेचा पूर्वीचा रेकॉर्ड
अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी बबन घावटे हा कुख्यात गुंड असून, त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी अशा १० गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. - या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, अनंत सालगुडे, रमेश गांगर्डे, गणेश लबडे, दीपक घाटकर, फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, शाम जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, रमीझ राजा आत्तार, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, प्रशांत राठोड, मनोज साखरे, सोनल भागवत, महादेव भांड, अर्जुन बडे यांच्या पथकाने सहभाग घेतला.
- स्रोत:(प्रेसनोट)

