संकटाच्या काळात गरजूंना मदतीचा हात.

दिनांक १ जून,श्रीगोंदा:

पंचायत समिती श्रीगोंदा अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकोप्याने सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने निधी एकत्रित करून, तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने, सदर भाग दि.८ जुन २०२० पर्यंत प्रतिबंधीत केला आहे.

प्रतिबंधीत कालावधी मध्ये या भागातील हातावर पोट असलेल्या कुटुंबांना दैनंदिन अन्नाची सोय व्हावी, यासाठी पंचायत समिती श्रीगोंदा अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी यांनी वैयक्तिक निधीतून ३० गरजूं कुटूंबाना १५००० कीमतीचा किराणा मालाचे वाटप गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याव्यतिरिक्त शासनस्तरावरून राजपत्रित अधिकारी यांचा दोन व वर्ग तीन कर्मचारी यांचे एक दिवसांचे वेतन कपात करण्यात येणार असून, ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार असल्याचे प्रशांत काळे (गट विकास अधिकारी) व (कर्मचारी युनियन चे अध्यक्ष) नागेश लोखंडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading