राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत, कोविड-19 संदर्भात श्रीगोंद्यात आढावा बैठक संपन्न..

दिनांक १ जून श्रीगोंदा:

शहरात पंतनगर येथील सांस्कृतिक सभागृहात राज्याचे मदत व पुनर्वसन,आदिवासी, ऊर्जा, नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत कोविड-19 संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी प्रशासकीय अधिकारी, सामाजिक व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. कोविड-19 प्रादुर्भाव संदर्भात उपाय योजनां विषयी तसेच तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात उपस्थित मान्यवरांनी चर्चा केली. आरोग्य, महसूल, पोलीस, नगरपालिका, पंचायत समिती, वीज वितरण कंपनी सह विविध प्रशासकीय अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते.

img_20200601_1209406416156841563650953.jpg

(जिल्हा परिषद सदस्य) बाळासाहेब हराळ, ऋषिकेश गायकवाड, मुकुंद सोनटक्के, (काँग्रेसचे तालुकाध्यक्ष) दीपक भोसले, हरिदास आबा शिर्के, (नगराध्यक्षा) शुभांगी ताई पोटे, (नगरसेवक) मनोहर पोटे, (माजी आमदार) राहुल जगताप, (राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष) घनश्याम आण्णा शेलार, बाबासाहेब भोस यांनी यावेळी सामाजिक व मूलभूत प्रश्नासंदर्भात चर्चा करीत, राज्यमंत्री यांच्यासमोर विविध प्रश्नांचा पाढा वाचला,तालुक्यातील विजेच्या व पाण्‍याचे प्रश्नासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.

स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध सामाजिक व सामान्यांच्या जनजीवनाशी संबंधित मूलभूत प्रश्नांवर चर्चा करीत, राज्यमंत्र्यांना पाठपुरावा करण्यासंदर्भात विनंती केली. श्रीगोंदा नगरपालिकेला विशेष निधी उपलब्ध करून स्थानिक प्रश्न मार्गी लावावा या संदर्भात मनोहर पोटे यांनी प्राजक्त तनपुरे यांना विनंती केली. तालुक्यातील विजेचा आणि पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला असल्याने पारेषण व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून तालुक्यातील वीज प्रश्न निकाल काढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत असताना तनपुरे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल,पोलीस व आरोग्य विभागाच्या कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. तालुक्यात दोन प्रकरणे समोर आली असून, तेही लवकर उपचार घेऊन बरे होतील. अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तालुक्याला कोरोणा पासून दूर ठेवणाऱ्या अधिकारांचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले. तालुक्यातील विविध प्रश्नी घनश्याम आण्णा शेलारांच्या माध्यमातून वेगवेगळे निवेदन येतात. जिल्ह्यात सर्वात जास्त सामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात पत्रव्यवहार व सूचना श्रीगोंदा तालुक्यातून होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की, सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचा शासनाचा हेतू आहे. नगरपालिकेने बनवलेल्या रस्त्याच्या दर्जा/गुणवत्ता संदर्भात पत्रकारांनी प्रश्‍न विचारले, कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे सामान्य जनजीवन प्रभावित झाले असताना,आदिवासी प्रवर्गातील लोकांसाठी उपाय योजना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच त्यांना जीवनावश्यक साहित्य व धान्य वाटप करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

श्रीगोंदा तालुका दलित आदिवासी अत्याचारग्रस्त तालुका घोषित करण्यासंदर्भात यापूर्वी अनेक आंदोलने झाली आहेत. आदिवासींच्या लहान मुलाचे खून प्रकरण, महिलेची नग्न धिंड, मारहाण व अपमान करणारे अनेक प्रकरनं श्रीगोंदा तालुक्यात पुढे आले असताना, आपण स्थानिक प्रशासन सूचना करणार असल्याचे यावेळी तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading