दिनांक ३१ मे,अहमदनगर:
अहमदनगर शहरातील, कोटला सवारी इमाम येथील अस्लम पठाण हा दिव्यांग व्यक्ती, ट्रेन मध्ये चिक्की विकून आपला उदरनिर्वाह करत होता. पण, कोरोना मुळे आता तो सध्या अडचणीत आहे. आता पाऊस तोंडावर आला असून, त्यांच्या घराची अवस्था खूप बिकट आहे.
याची माहिती मिळताच नामदार बचुभाऊ कडू यांच्या कार्यप्रेरनेने ह.भ.प. महाराज व प्रहार संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अजय बारस्कर, (राज्य उपाध्यक्ष) संतोष पवार, (जिल्हाध्यक्ष) विनोदसिंग परदेशी, (अपंग क्रांति जिल्हाध्यक्ष) लक्ष्मण पोकळे यांनी भेट दिली. परिस्थिती समजून घेऊन, लगेच आठ दिवसांत नवीन घर बांधून देऊ, असे सांगून लागलीच कामास सुरुवात केली आहे. यावेळी, उपाध्यक्ष पप्पू येवले, कार्याध्यक्ष अजित धस, सचिव प्रकाश बेरड उपस्थित होते.
